Friday, December 20, 2013

छोटीसी कहानी.. भाग ३ (शेवटचा)


रश्मी तिन दिवसानंतर येणार होती, तिचा नवरा गेला की मग ती व्हिसा येई पर्यंत मुंबईलाच रहाणार होती. गेल्या दोन तिन दिवसांपासून मात्र रिया पण घरी आली नव्हती. रश्मीचा मात्र दर रोज फोन येत होता. तिनेच सांगितलं की रियाचं आणि तिचं बोलणं अगदी दररोज सुरु होतं.

रश्मीचा फोन आला होता, नेमका राहुलनी घेतला फोन.. काय गं? कशी आहेस? वगैरे बोलणं झालं, रश्मी म्हणाली, अरे दादू रियाचं पण लग्न ठरतंय रे.. ती आली होती का घरी? राहुल एकदम ओरडलाच.. म्हणे काय?? तिचं लग्न? कोण करतंय तिच्याशी लग्नं? त्या येडपट माणसाला एकदा बघायचंय.. चल रे उगीच काही तरी बोलू नकोस वात्रट सारखं, आईला दे फोन.. रश्मी म्हणाली.

राहुल नेहेमी प्रमाणे सोफ्यावर आडवी उशी लावून हा्तात पुस्तक घेउन बसला होता . पुस्तकाचं पान समोर उघडं होतं, पण राहुलला काही लक्षात येत नव्हतं काय वाचतोय ते…मन सैर भैर झालं होतं. असं का होतंय? तिचं लग्न ठरतंय तर मग मला का अस्वस्थ वाटतंय?? राहुल तसाच बसून राहिला. सारखं दाराकडे लक्ष जात होतं. रिया येईल आणि मग आपल्याकडे बघून हसत रश्मीच्या खोलीकडे चालत जाईल..असं सारखं वाटत होतं.

आई पण बराच वेळ बोलत होती रश्मीशी, पण काय बोलत होती तेच कळत नव्हतं. राहुल उठला आणि सरळ चप्पल पायात सरकवून बाहेर निघायला फिरायला. खूप वेळ अगदी कुठेही फिरत होता. शेवटी कॉफी हाउस मधे जाउन कडक फिल्टर कॉफी मागवली..आणि विचार करित बसला. कॉफी चा कप समोर आणून ठेवला होता वेटरने, आणि आता त्याला पण जवळपास दहा मिनिटं झाली होती. तिकडे पण त्याचं लक्षं नव्हतं. अगदी खरं सांगायचं तर कुठेच लक्ष लागत नव्हतं.. समोर वेटरने आणून ठेवलेल्या बडिशोपेच्या डिश मधे त्याने न घेतलेल्या कॉफी चे पैसे टाकले , आणि उठून चालायला लागला.

परत घरी येउन पोहोचला.. तास भर निर्हेतु भटकल्यावर.. अजूजुनही खूप लो वाटत होतं. असं का होतय?? घरी आला ,तर रिया समोर बसली होती. आईशी गप्पा मारत. आई तिच्या डोक्याव्रून हात फिरवत होती, राहुल ला जाणवलं, की आई रश्मी ला खूप मिस करते आहे म्हणून. आई म्हणाली, काय रे दादू , कॉफी घेणार? राहुल ला कॉफी हाउस मधला, न प्यायलेला कॉफीचा कप आठवला, म्हणाला.. हो. चालेल.

आता समोर रिया बसलेली होती. तिच्या समोरच्या खुर्चीवर बसला, आणि तिला म्हणाला… हं.. काय करतो गं मुलगा?? आणि रिया कडे पाहिलं. रियाच्या डोळ्यात खूप राग दिसला… तुला काय करायचंय? काय करतो म्हणे?? काहीही करित असेल….. ~! इतकं संतापायला काय झालं हेच समजल नाही राहुल ला. साधा प्रश्न विचारला .. आणि ही अशी रिऍक्शन.. गेलीस उडत.. असं म्हणून निघून जावं समोरून असं क्षणभर वाटलं..

राहुलला पण तिला चिडायला काय झालं हेच कळत नव्हतं.तिच्या चेहेऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता.. काहीच बोलली नाही ती. चिडली तर चिडु दे म्हणून समोरून नेहेमी प्रमाणे निघून न जाता, तिला काय झालंय हे समजून घेणं जास्त महत्वाचे वाटु लागलं एकदम.. तिच्या समोर बसला, आणि तिच्या कडे पाहिलं..

तिचे बोलके ब्राउन डोळॆ अगदी काहीही न बोलता खूप बोलावून गेले..राहुलच्या डोक्यात एकदम प्रकाश पडला.. म्हणजे ………………??? हं…….!!!हे इतके दिवस का लक्षात आलं नाही? किती मुर्ख आहोत आपण?? राहुलने तिच्याकडे बघितलं,तिची नजर खाली जमिनीकडे होती. डोळ्यात दुखावल्या चे भाव दिसत होते. तसंही मुलींना आपल्याकडे कोणी पहात असलं की लवकर कळतं. रियाने नजर उचलली, आणि समोर राहुलकडे पाहिलं… आर्त नजर.. खूप काही सांगायचंय रे मुर्ख माणसा….. कधी समजणार तुला??? मला काय म्हणायचंय ते??

राहुलला अचानक जाणिव झाली की आपल्याला काय होतंय याची. अचानक रिया बद्दल खूप काळजी वाटली त्याला… एकदम आवडायला लागली ती! कित्येक वर्ष जिच्या शोधात होतो, ती हीच!!! हे पण लक्षात आलं.. राहुलने तिच्या नजरेत नकळत नजर गुंतवली अन लहानसं स्मित हास्य केलं. सगळं काही होतं त्या हास्यामधे.. प्रेम, जवळीक, काळजी , सगळं काही होतं . अगदी पुर्ण अशुअरन्स सहीत.. तिच्या पण डोळ्यात सगळं समजल्याची भावना दिसली. एकही शब्द न बोलता दोघांच्या मनात एकमेकांच्या भावना पोहोचल्या होत्या..

आयुष्यात पहिल्यांदा रिया बरोबर न चिडता बोलावंसं वाटत होतं, पण काय बोलावं ? कसं बोलावं? हेच समजत नव्हतं.संध्याकाळी नेहेमी प्रमाणे रिया ला सोडायला राहुल निघाला, तेंव्हा दोघंही एकही शब्द न बोलता चालत होते रस्त्यावरुन. रियाचं घर आलं, ती वर जायला लिफ्ट ची वाट पहात उभी होती. राहुल कडे थकलेल्या नजरेने पहात.. की आता तुच काही करु शकशील रे… नाहीतर कठीण आहे…राहुल काही न बोलता ती लिफ्ट मधे शीरे पर्यंत उभा राहिला, आणि लिफ्ट चं दार बंद झाल्यावर परत निघाला.

घरी आल्यावर पण त्याला सारखं रिया ला पहायला आलेल्या त्या न पाहिलेल्या मुलाचा चेहेरा डोळ्यापुढे सारखा येत होता. झोप येत नव्हती. आईने जेवायला बोलावलं, तरी पण ऐकू येत नव्हतं.. दुसऱ्या दिवशी रश्मी आली. खुप खुप बोलत होती आईसोबत.. आईशी मनसोक्त बोलणं झाल्यावर आई म्हणाली की आता थोडा सांजा करते..भूक लागली असेल ना?? रश्मी हो म्हणाली.. आणि आई आत गेली.

हं.. बोल दादू.. काय म्हणतोस?? असा चिंताग्रस्त का दिसतोस? काय झालं?? राहुलला कसं बोलावं हेच समजत नव्हतं. बरं आजपर्यंत रियाला पण सरळ विचारलं नव्हतंच नां.. किंवा तिला सांगितलं पण नव्हतं, की आय लव्ह यु म्ह्णून.. कसे काय लोकं सांगू शकतात असं? ह्या सगळ्या गोष्टी तर आपोआप होत असतात.हिंदी सिनेमात कसं सगळं मस्त दाखवतात, की हिरो हिरोइनला आय लव्ह यु म्हणतो.. नाही तर आपण.. नुसते मुख दुर्बळ.. कधीच सांगु शकणार नाही रियाला. बरं मी नाही, तर तिने तरी सांगायचं नां.. पण नाही.. ती पण काहीच बोलायला तयार नाही.

आता तर लग्नं पण ठरतंय तिचं, कालच येउन बघून गेला म्हणे मुलगा. तिला नकार तर येणार नाहीच.. इतकी सुंदर आहे ती.. स्वतःलाच शिव्या घालत होता राहुल, हा काय मुर्खपणा, इतके वर्षं तिला बघतो आहेस, पण कधी लक्षात आलं नाही गधड्या की ती आपल्याला आवडते म्हणून.

खरं खरं आयुष्य जर सिनेमातल्या सारखं असतं तर किती बरं झालं असतं नां?? मस्त पैकी आपण म्हंटलं असतं, आय लव्ह यु वगैरे.. मग तिने पण मान्य केलं असतं, आणि मग पुढचं सगळं…. रश्मी म्हणाली.. ओये…. दादू.. अरे कुठे हरवलास?? तसा एकदम बांध फुटला राहुलचा, डोळे भरुन आले, पण आता रश्मीला दिसू नये म्हणून तोंड फिरवलं, पण तिने पाहिलंच बहुतेक..

ती उठली , आणि हळूच राहुलच्या शेजारी जाउन उभी राहिली. त्याच्या केसातून बोटं फिरवत म्हणाली.. अरे तुला रिया आवडते नां?? झटक्याने राहुलने तिच्याकडे बघितलं, तर तिच्या नजरेत एक खोडकरपणा स्पष्ट दिसत होता.. म्हणाली, अरे मला ती वहिनी म्ह्णून आवडेल .. पण तु एक महामुर्ख, इतके दिवस झाले, कधी पाहिलंच नाही तिच्याकडे.ती पण तशीच. .. सगळ्या मनातल्या गोष्टी मनात ठेवायची.

पण माझं लग्नं ठरलं, तेंव्हा मात्र तिला विचारलंच मी एकदा.. आणि तिने मुक होकार दिला..तेंव्हाच ठरवलं, की या दगडाच्या मनात काय आहे हे पण बघु या, म्हणून मग सारखं तिला काही ना काही कारण काढून तुझ्या बरोबर बाहेर पाठवलं. मला असं वाटलं होतं की कदाचित तुझ्या लक्षात येईल, आणि सगळं आपोआप होऊन जाइल .. पण नाही… तु एक नंबरचा वेंधळा, अजिबात तुला काही समज नाही…

अगं पण तिचं लग्नं ठरतंय नां?? राहुल म्हणाला… रश्मी हसली, म्हणाली, अरे तुला तिच्या बरोबर इतक्या वेळा बाहेर एकत्र पाठवून पण तु तिला काही बोलू शकला नाहीस, तेंव्हाच माझ्या लक्षात आलं, की आता मलाच काहीतरी करावं लागेल, नाहीतर तिचं कुठेतरी लग्नं ठरेल, आणि तु बसशील हात चोळत. म्हणुन हा हुकुमाचा एक्का वापरला आम्ही..

मीच रियाला सांगितलं, की तुला सांग तिचं लग्नं ठरतंय म्हणून.. आणि तिने तुला सांगताच, तुला ही जाणिव झाली की रिया आता दुसऱ्या कोणाची तरी होणार, आणि तुला तिची किम्मत कळली. तशी पण तुला ती आवडत होतीच , पण या बातमी मुळे तुला समजलं की तुला आवडते… बस्स.. …

म्हणजे??????????? तिचं लग्नं वगैर काही ठरलं नाही??? आणि एकदम हसत सुटला. म्हणजे रिया पण सामिल आहे कां यात? अरे रियाच काय, आपली आई पण सामील आहे यात.. तिला पण सगळं माहिती आहे, तुच एकटा आहेस बुद्दु….

अरे आजी नेहेमी म्हणायची ना, एखादी गोष्ट तुमच्या समोरुन निघून गेली की मग तुम्हाला त्याची किंम्मत कळते. आणि नेमकं तेच झालं तुझ्या बाबतीत….

रश्मी आल्याचं रियाला पण कळलं होतंच.. हे सगळं बोलणं सुरु होतं तेवढ्यातच रिया पण आली.. म्हणाली काय गम्मत झाली गं ? कशाला हसताय? मला पण सांगा म्हणजे मला पण हसता येईल.. तिच्याकडे पाहिलं, अन म्हणाली… वहिनी .. बस इकडे!! असं म्हंटलं.. रियाच्या तिच्या गालावर गुलाब फुलले… आणि राहुल पण आता रश्मी समोर नसती तर आपण काय केलं असतं याचा विचार करु लागला.. :)

छोटीसी कहानी.. भाग २


दोन तिन दिवसांपासुन थोडी तब्येत नरम गरमच होती राहुलची . सुटी घेतली असती तर तो खवीस ओरडला असता, आणि मग पुन्हा घरी जातांना सुटी देतांना त्याने इशु केला असता, म्ह्णून तापातच ऑफिस मधे गेला होता. क्रोसिन घशाखाली उतरवली कॉफीच्या घोटाबरोबर , आणि आपल्या क्युबिकल मधे बसला.

डोकं भयंकर दुखत होतं, दोन कप कॉफी संपवली तरी पण शांत वाटत नव्हतं. आता दिवाळी जवळच आली होती. दिवाळीच्या सुटीला लागुनच पंधरा दिवस एल टी सी घेतली होती. बॉस ने नेहेमी प्रमाणेच कुरकुर केली, म्हणाला, ग्रो अप!! बी प्रोफेशनल.. ( म्हणजे काय असतं?? ) आणि अजुनही बरंच काही सांगत होता की कसा तो नेहेमी सुटी न घेता काम करित असतो ते. म्हणे वर्ष भर कॅजुअल सुटी घेतलेली नव्हती त्याने.आणि जर मोठं व्हायचं असेल तर सुट्या वगैरे विसरा , आता जर सुट्या न घेतल्याने मोठं होता येत असेल तर ते काय कामाचे??

दिवाळीसाठी घरी जायचं म्हणून तयारी सुरु करायलाच हवी. बरीच पर्सनल कामं पेंडींग होती, आईसाठी साडी, रश्मिचा ड्रेसचा कपडा आणि बरंच काही.उद्या सुटी आहे रविवारची, आणि पुढल्या शनिवारी निघायचंय. तेंव्हा सगळी खरेदी आधी उद्याच आटोपावी लागेल कुठल्याही परिस्थिती मधे. एसी मधे पण दरदरुन घाम सुटला, बहुतेक क्रोसिनचा असर झाला असावा.. वॉश रुम मधे जाउन चेहेऱ्यावर पाण्याचा हबका मारला, आणि समोरच्या एसी ब्लोअर खाली उभा राहिला . ताप उतरल्यामुळे आता एकदम फ्रेश वाटत होतं.

किती दिवसानंतर इतकं छान वाटलं बरं आज?? उत्साहाच्या भरात पिसी समोर जाउन बसला आणि कामाला सुरुवात केली. संध्याकाळी एमजी रोडला जायचं मनात नक्की केलं , आणि घरच्या आठवणींच्या गुंतून गेला. कसा बसा दिवस ढकलला, आणि दुसऱ्या दिवसाच्या प्लानिंग मधे राहुल मग्न झाला.

शेवटी रविवारचा दिवस उजाडला. आज खुप काम करायचं होतं, मार्केटला गेल्यावर कपडे वगैरे खरेदी केली. आईची साडी, रश्मीचा ड्रेस , पप्पांचा शर्ट सगळं झालं , तेवढ्यात त्याची नजर समोरच्या काळ्या टॉप वर गेली.. आणि त्याला रिया आठवली.. तिला छान दिसेल ना?? आणि तो पण पॅक करुन घेतला होता – वेगळा!!

होता होता, एक आठवडा कसा भुर्रकन उडुन गेला, आणि राहुल दिवाळी साठी घरी निघाला. एअर पोर्ट वर पप्पा आले होते रिसिव्ह करायला.आता पंधरा दिवस काही एक काम नाही करायचं.. नुसता आराम!! बस्स!असे विचार मनात येत होते. इथे पण मनात सारखे तेच विचार सुरु होते, की यावं कां परत मुंबईला?? बस्स झालं !!

राहुल घरी पोहोचला. सगळे जण वाट पहात होते. रश्मी , रिया दोघी पण बसलेल्या दिसल्या. तेवढ्यात फोन ची घंटी वाजली, आई ने फोन उचलला, तर मुलाकडच्यांचा फोन होता. म्हणत होते की मुलगा उद्या संध्याकाळी परत जाणार आहे, तेंव्हा फक्त उद्याच सकाळीच वेळ आहे त्याला रश्मीला पहायला येण्यासाठी. रश्मी पण लाजुन लाल झाली होती. रिया पण खोडकर पणे रश्मी कडे पहात होती.मला या बद्दल काहीच माहिती नव्हते. ही सगळी डेव्हलपमेंट गेल्या दोन दिवसातली होती. आई म्हणाली आता तुझा पण नंबर लाउ या लवकर..

दुसरा दिवस उजाडला, आणि सकाळीच दाखवणे हा कार्यक्रम आटोपला, दोघांचिही पसंती झाली, आणि लग्नाची तारीख पण नक्की करण्यात आली. इतक्या लवकर लग्न जुळतं?? राहुल थोडा आश्चर्य चकीत झाला. आई म्हणाली, की आता रश्मी सासरी गेली की मग घर एकदम रिकामं वाटेल , तेंव्हा आता दादूसाठी पण मुली पहायला हव्यात.असं कोणी म्हंटलं की लाजल्या सारखं होतंच ना.. आणि ते पण साहजिकच होतं म्हणा. आईने असं म्हंटलं की ऑफिसमधल्या वेगवेगळ्या मुलींना आपल्या बायकोच्या जागी कल्पना करुन मस्त टाइम पास व्हायचा. कधी भसा भसा सिगारेट ओढणारी ती सिन्हा बायको म्हणून कशी वाटेल? असा काही विचार मनात आला की राहुलला स्वतःचंच स्वतःला हसु यायचं. काही दिवसांपूर्वी ऑफिस पिकनिकच्या वेळेस ती शेजारी बसली होती बस मधे. रात्री परत येतांना पुर्ण टूल्ली होती.. राहुल बिचारा पुढचे दोन दिवस खांद्याला आयोडेक्स चोळत बसला होता.

रश्मीचं लग्नं ठरलं आणि मुलगा लगेच ऑन साईट जाणार, म्हणून लग्नाची तारीख फक्त एका आठवड्यानंतरचीच काढावी लागली. रश्मीचा पासपोर्ट अव्हेलेबल होताच. लग्न झाल्यावर डिपेंडंट व्हिसा मिळणं सहज शक्य होतं, म्हनुन लग्नाची घाई होती आणि घरातलं वातावरण एकदम बदलुन गेलं होतं. सगळीकडॆ खुप उत्साह होता. रिया पण सारखी रश्मी च्या मागे मागे असायची. दोघींचही पान एक मेकींच्या शिवाय पान पण हलत नव्हतं. सारखी रिया राहुलच्याच घरी असायची. तिचं पण कॉलेज संपलं होतं, त्यामुळे कूठलच टेन्शन नव्हतं तिला पण. लग्न अगदी पुर्णपणे एंजॉय करित होती ती..

लग्नाचं शॉपिंग म्हणजे एक मोठं काम. रश्मीचे कपडे टाकले होते शिवायला. रश्मी म्हणाली की दादू कपडे आणून दे माझे, सोबत रियाला पण घेउन जा.. म्हणजे ती सगळं तपासुन घेईल व्यवस्थित आणि पुन्हा दुसरी चक्कर पण होणार नाही. राहुलच्या कपाळावर चार आठ्या उमटल्या. रश्मी राहुलच्या पुढे उभी राहिली आणि त्याच्या कपाळावरच्या आठ्या दोन बोटांनी सरळ करित म्हणाली.. इतकं वाईट वाटून घ्यायला नको, रियाला सोबत ने म्हंटलं तर.आठ्या दूर कर दादू नाहीतर इस्त्री करावी लागेल !!

बाइकला किक मारुन स्टार्ट केली. रिया पण मागे बसली . जिन्स घातलेली असल्याने दोन्ही साईडला पाय घालुन बसली होती. बाइक सरळ सुरु करुन मार्केटला दुकाना समोर थांबवली. रिया खाली उतरली, तर राहुल म्हणाला, इथे नो पार्किंग आहे, तु जाउन सामान घेउन ये, मी इथेच थांबतो . भर दुपारी दोन वाजताची वेळ होती. उन्हामुळे घामाच्या धारा सुरु होत्या. स्वतःवरच वैतागला राहुल. किती वेळ लावणार अजुन ही?? इतकी वेंधळी आणि हळूबाई असेल तर हिच्या नवऱ्याचं काही खरं नाही.. आणि स्वतःशीच हसला.. तेवढ्यात रिया परत आली आणि बावळटसारखा हसणाऱ्या राहुल कडे आश्चर्याने पहात राहिली.

बराच वेळ उन्हात उभं असल्याने घसा कोरडा पडला होता, बाइक वर रिया बसली, आणि राहुलने बाइक सरळ समोरच्या शेट़्टीच्या हॉटेल समोर पार्क केली. तिने काही न बोलता हॉटेलमधे त्याच्या सोबत शिरली. तिचा चेहेरा लाल बुंद झाला होता उन्हाने. नाकाचा शेंडा थोडा जास्तंच लाल दिसत होता. घामाचे थेंब कपाळावर जमा झाले होते. पिटुकला रुमाल बाहेर काढून तिने चेहेरा पुसला.. आणि राहुलने काही म्हणण्या आधीच म्हणाली.. एक पेप्सी .. माझ्यासाठी..

लहानपणापासुन एक मेकांना ओळखत असल्यामुळे दोघंही कम्फर्टेबल होते. काहीतरी बोलायचं म्हणून राहुल म्हणाला, कॉलेज काय म्हणतंय? तिने वर पाहिलं, आणि तिच्या डोळ्यात पाहिल्यावर राहुलला समजलं की हा प्रश्न एक्स्पेक्टेड नव्हता.. शी वॉज एक्स्पेक्टींग समथिंग डिफरंट.. काय असावं बरं ते?? कपड्यांचं काम झालं होतं, आता इतर लहान सहान कामं पण होती, जसे भटजी बुवांना सांगून वेळ पक्की करणं, केटरर ला भेटुन मेनु मधले बदल सांगायचे वगैरे वगैरे..

रश्मी प्रत्येक ठिकाणी राहुलच्या बरोबर रियाला पाठवित होती. आणि रिया पण आनंदाने बाइकवर मागे बसुन फिरायची. राहुल मात्र खुप वैतागला होता.. हे काय सारखं मगे शेपुट लावल्यासारखं हिला घेउन फिरायच? सगळी कामं मी एकटाच करु शकतो नां? मग ही ब्याद कशाला मागे उगीच? पण रश्मीचं मन मोडायचं नाही, म्हणून प्रत्येक वेळेस रियाला बरोबर घेउन जात होता.

कितीही नाही म्हंटलं तरी पण रिया बाइकवर मागे बसली की त्याला आवडायला लागलं होतं. बाहेरची कामं आटोपून दोघंही परत निघाली घरी जायला. घरी जाई पर्यंत राहुलला सारखं वाटत होतं की तिला काहीतरी बोलायचंय, पण त्याच्या काहीच लक्षात आलं नाही. एक आठवडा कसा निघून गेला ते समजलं पण नाही. रश्मिच्या लग्नाचा दिवस उजाडला. लग्नाला फारच कमी लोकं बोलावले होते, फार कमी वेळ असल्यामुळे. लग्न आटोपुन रश्मी गेली तिच्या नवऱ्याबरोबर.. आता घरामधे अगदी कोणीच नव्हतं. आई तर खूप कंटाळली होती. सारखी डोळ्यात पाणी आ्णून रडत होती.रश्मी दोन दिवसानंतर येणार होती परत.

( पुढे चालु )

छोटीसी कहानी.. भाग १



संध्याकाळचे साडे सात वाजले होते. हिवाळ्याचे दिवस.. थोडं अंधारल्या सारखं झालं होतं बाहेर. राहुल वय वर्ष १५ समोरच्या सोफ्यावर बसुन हातात केमेस्ट्रीचं पुस्तक घेउन आणि त्या मधे फॅंटमचं कॉमिक्स लपवुन वाचत बसला होता. आई ओरडली की अभ्यास करतोय म्हणुन सांगायला. हे कॉमिक्स वाचणं म्हणजे एकदम पास टाइम.. आणि आजकाल तर जेम्स हॅडली ची पुस्तकं वाचायची पण गोडी लागली होती.

आतल्या खोलित राहुलची लहान बहीण रश्मी वय वर्ष १२ असेल, बसली होती आपल्या जिवश्च कंठश्च मैत्रीण रिया बरोबर खेळत. रिया आणि रश्मी लहानपणापासुनच्या मैत्रीणी. दोघी पण अगदी फ्रॉकला रुमाल पिनेने टाचुन बरोबर जायच्या बालक मंदिरात. तेंव्हापासुनची मैत्री. दर रोज संध्याकाळ झाली की रिया इकडे म्हणजे रश्मी कडे यायची खेळायला. दोघींचं एकत्र खेळणं सुरु असायचं मग.. बहुतेक बाहुली सोबत खेळणं .. आणि उरला वेळ फिदी फिदी हसत रहायच्या दोघी पण.. अगं काय झालं?? म्हणुन विचारलं, तर काहीच नाही म्हणुन अजुन जोरात हसायच्या. वेळ उरलाच तर घराच्या मागे असलेल्या घसरगुंडीवर आणि झुल्यावर खेळायला जायच्या दोघी पण.

एक मेकावर न रागावणं या बाबतीत मात्र त्यांचं एकमत होतं. कधी तरी भांडणं पण व्हायची दोघींची , पण ती क्षणभंगुर असायची. थोडा अंधार झाला, आणि रामरक्षा म्हणायची वेळ झाली की , अरे दादू , सोड ना रे रियाला तिच्या घरी… म्हणुन रश्मी मागे लागायची. आता शेजारच्या पाच बिल्डींग सोडून घर.. कशाला हवी सोबत ?? आणि एकाच तर कॉम्प्लेक्स मधे आहे? मुंबई एकदम सेफ आहे, काही होत नाही.. जाउ दे एकटीला, फारतर बाल्कनीतुन पाहतो ती घरी जाई पर्यंत.

रिया, टिपिकल कोकणस्थी स्वच्छ गोरा रंग, ब्राउन डोळे.. दिसले की अगदी मनाच्या अंतरंगापर्यंत ठाव घेतील असे.. लांब वेणीच्या टोकाला बांधलेल्या शाळेच्या निळ्या रिबन्स.. बारीक फुला फुलांचा फ्रॉक उगिच डोळ्यात आर्त भाव आणुन राहुल कडे पाहु लागली, आणि राहुल ह्या नजरेलाच खुप घाबरायचा. तिने अशा नजरेने पाहिलं की ह्याला नाही म्हणताच येत नव्हतं, आणि हीच गोष्ट नेमकी रियाला पुर्ण पणे माहिती होती.

चरफडतच हातातलं पुस्तक खाली टाकुन उठला राहुल, आणि पायात चप्पल अडकवुन तयार झाला. रिया कडे बघितलं.. शांत चेहेरा…हसरे डोळे… आणि थोडा वात्रटपणा.. कसं हो म्हणायला लावलं तुला म्हणुन डोळ्यातुन ओसंडुन वहायचा!!!!

राहुल हेच काम , म्हणजे रियाला घरी सोडायचं गेली कित्येक वर्ष न चुकता करित होता. आता त्याची सवय पण झाली होती. रस्त्याने जातांना, तु लवकर कां घरी जात नाहीस?? रोज च्या रोज मला का त्रास देतेस?? असं म्हंटलं, तर सरळ हसुन दुर्लक्ष करायची. या वयात म्हणजे १४-१५ वय असतांना मुलांना नेमकं आपल्याला कोणी कुठल्याही मुली सोबत पाहू नये असं वाटत असतं. आणि नेमकं इथे रोज रियाला सोडातांना शेजारच्या बिल्डींग मधली मुलं बघायची, त्यामुळे अजुन चिडायचा राहुल..

हाच प्रकार गेली कित्येक वर्ष चालत होता. रिया ला घरी सोडणं.. आता राहुलचं इंजिनिअरिंगचं पाचवं सेमिस्टर होतं. रिया आली होती १२वीला. तरी पण रोज संध्याकाळच्या येण्यामधे काही खंड पडला नव्हता. लहान असतांना रिया ने रश्मीच्या घरी येण्याचं कारण होतं ते घराच्या मागे असलेला झुला आणि घसरगुंडी.. पण आता मोठ्या झाल्यावर पण रियाचंच येणं सुरु राहिलं. आता घसरगुंडीवर खेळण्याचे किंवा झुल्यावर झुलण्याचे दिवस गेले होते. पण सवईचा परिणाम.. अजुनही रिया दररोज अगदी न चुकता संध्याकाळी यायची गप्पा मारायला. त्यांच्या हळू हळू आवाजात गप्पा सुरु असल्या की आई ओरडायची.. काय गं? कसल्या गप्पा मारताय इतक्या? पण काही नाही गं, उगिच काहीतरी बोलतोय झालं. असं उत्तर द्यायच्या.

राहुलला रिया बद्दल तसं कधीच अट्रॅक्शन वाटत नव्हतं . आता १७ -१८ वर्षाची झाल्यावर रिया तर सुंदरच दिसायची यात काहीच संशय नाही,पण तिच्या कडे बघितलं, की तिचा तो लहानपणी पाहिलेला ( फ्रॉकला रुमाल पिन ने टाचलेला ) अवतारच आठवायचा राहुलला , तर कधी त्या रुमालाने नाक पुसणारी रिया आठवायची, आणि त्यामुळे तशा नजरेने कधीच तिच्याकडे पाहु शकत नव्हता तो.. थोड्याच वेळात रश्मिने एक प्लेट आणली आणि समोर ठेवली.. केक आणि वेफर्स.. म्हणाली की आज रियाचा वाढदिवस आहे.. म्हणुन केक. राहुल उठला आणि उगिच पुटपुटला हॅपी बर्थ डे म्हणुन.. तिच्या कडे न पहाता.. का कोणास ठाउक पण आज राहुलला रियाकडे सार्ख पहात रहावंसं वाटत होतं.

खुपच सुंदर दिसत होती रिया आज. राहुलने दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला आणि आपलं वाचन सुरु ठेवण्याचा प्रयत्न करु लागला . रिया ने थोडं हसल्यासारखं, केलं आणि आतल्या खोलीकडे वळली. साडी नेसली की मुलगी कित्ती मोठी दिसते नां?? राहुलची नजर पुस्तका वरुन विचलीत झाली होती..

संध्याकाळी नेहेमी प्रमाणे प्लिज रियाला सोडुन ये ना रे दादू … रश्मी म्हणाली. आणि नेहेमी प्रमाणेच कुरकुर करता पायात चप्पल अडकवुन राहुल तयार झाला. तसं रिया चं घर बरोबर सहाव्या बिल्डींग मधे , पाचव्या मजल्यावर होतं. दोघंही बाहेर निघाले, आणि तेवढ्यात एकदम जोरात पाउस सुरु झाला. जवळच असलेल्या बिल्डींग कडे दोघांनी पण धाव घेतली. आडोसा धरुन दोघंही उभी राहिली. तिचा पदर अंगावर चिकटला होता, थोड्या पावसामुळे, ती आपले कपडे उगिच व्यवस्थित केल्या सारखे करित होती. मुंबईचा पाउस.. लवकरच थांबला, आणि तिला सोडुन परत निघाला राहुल.

१२वीचा निकाल लागला होता, आणि नेमकं रियाला पुण्याच्या लॉ कॉलेज मधे ऍडमिशन मिळाली होती. इतक्या दिवसांची /वर्षांची सवय असल्यामुळे दोघींना पण खुप वाईट वाटत होतं. आता संध्याकाळ कशी जाईल म्हणुन रश्मी पण अपसेट झाली होती. दोघींनी पण दिवस भर मस्ती केली , आणि शेवटी जड मनाने रियाला निरोप दिला. तशी रिया अधुन मधुन येतंच रहाणार होती मुंबईला..

होता होता,काही वर्ष निघुन गेली. रियाचं कॉलेज सुरु होतं. इकडे राहुलचं इंजिनिअरींग पुर्ण झालं होतं. त्याला पण नोकरी लागली होती , आता कामानिमित्य बॅंगलोरला जावं लागलं राहुलला. इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग करुन आयटी कंपनीत काम करणं सुरु केलं होतं त्याने. दिवस मस्त जात होते. सगळं नविन वातावरण.. इथे पण सेट झाला होता राहुल. घरची आठवण तर यायचीच. नेहेमीच घरी जावंसं वाटायचं. आईच्या हातचं जेवण सगळ्यात जास्त मिस करित होता राहुल.

इथे पैसा वगैरे जरी चांगला मिळाला, तरी पण मानसिक समाधान नव्हतं. सारखं काही तरी टेन्शन असायचंच.. प्रोजेक्ट्स , डेड लाइन्सच्या रगाड्यात इतर कुठल्याही गोष्टींचा विचार करणं शक्य होत नव्हतं. सभोवताली दिसणाऱ्या कॉस्मोपॉलिटीयन कल्चरच्या मुलींच्या कडे कधीच लक्ष गेलं नव्हतं. लंच टाइम मधे समोरच्या पान टपरीवर मुली पण मुलांच्याच बरोबरीने सिगारेट ओढतांना पाहुन थोडं चुकल्या सारखं व्हायचं.. नुकताच एक मित्र लिव्ह इन रिलेशनशिप मधे गुंतला होता. आपणही तसंच काही तरी करावं असं वाटायचं, पण हिम्मत होत नव्हती . किती दिवस काढायचे असे??

अर्थात दर चार सहा महिन्यांनी एक चक्कर तर घरी मुंबईला व्हायचीच. मग एकदा घरी गेलं ,की नुसते कोड कौतुक करुन घ्यायला आवडायचं राहुलला. आई मग मुलगा आला म्हणुन चांगलं चुंगलं खायला करणार.. मजा यायची. सुटीचा तसा प्रॉब्लेम असायचाच, त्यामुळे मात्र थोडा कंट्रोल आला होता सारखा मुंबईला जाण्याबद्दल. आता इथे मुंबईला नौकरी मिळाली तर कित्ती बरं होईल असं वाटत होतं. आयुष्यातल्या प्रायोरीटीज बदलल्या होत्या. ऑन साइट जायला मिळावं म्हणुन पण प्रयत्न सुरु होतेच. जर ऑन साईटचा लालिपॉप नसता, तर ही नौकरी कधीच सोडली असती, आणि मुंबईला परत गेलो असतो , असा विचार तर नेहेमीच धडका मारायचा .
( पुढे चालु )

एक छोटीशी प्रेमकथा


एक छोटीशी प्रेमकथा
१५ वर्षापूर्वीची गोष्ट असेल. मी त्यावेळेला शाळेत होतो. शाळा सुटली की माझा क्लास असायाचा. शाळा सकाळची होती ७ ते १२ वाजेपर्यंत आणि क्लास ३ ते ५ वाजेपर्यंत. क्लास मधे माझ्या बाजूला एक देखणा मुलगा बसायचा. पहिल्या दिवसापासून तो माझ्या बाजूला बसत होता आणि चांगला मित्र पण झाला होता. आपण त्याला ह्या गोष्टी चा राजा म्हणुया. आमच्या क्लास मधे आमच्या शाळेशिवाय ईतर मुले मुली पण असायचे. राजा पण दुसर्‍या शाळेतला होता. आम्ही क्लास मध्येच एकत्र भेटायचो. एकदम मनमोकळा स्वभावाचा. नेहमी हसरा चेहरा. एक साइड चा भांग पाडला कि दिसायला विनोद खन्ना होता. घरची परिस्थिती पण चांगली होते. त्यावेळेला सुद्धा आम्हा सर्वाना वडापाव, चॉकलेट घ्यायची त्याची ऐपत असायची. आमच्या खिशात त्यावेळेला चुकून माकून एखादे चार आणे मिळाले तर नशीब. पॉकेटमनी हा प्रकारच अस्तित्वात नव्ह्ता. पहिल्या दिवशी क्लास मधे आल्यापासून तो माझा चांगला मित्र झाला. क्लास सुटल्यावर पण आम्ही खूप धमाल करू. त्यावेळेला त्याच्या कडे सायकल होती. त्यावेळेला सायकल असणे म्हणजे आता कॉलेजात जाणार्‍या मुलाकडे मर्सिडीज असण्यासारखे होते. आम्ही डबल सीट बसायचो, अर्थात सायकल तोच चालवायचा. मला घराच्या मागच्या गल्लीत सोडायचा आणि निघून जायचा.
आमच्या क्लास मधे एक सुंदर मुलगी पण होती. लांबसडक पाठीवर रुळणारे केस, गोरीपान काया, अंगाने नाजुक शिडशिडित बांध्याची, पाणीदार डोळ्यांची. हिच ह्या कथेची “राणी”. हा राजा आणि राणी एकाच शाळेत आणि एकाच वर्गात पण होते. दोघे राहायला पण बाजूबाजूच्या सोसायटी मधे होते. राजा च्या बिल्डिंग च्या बाजुने पोलिस वसाहत चालु होत होती. तिचे वडिल पोलिस खात्यात कामाला होते. चांगल्या वरच्या पोस्ट वर होते त्यामुळे त्यांना जरा बर्‍यापैकी बिल्डिंग मध्ये रहायला मिळाले होते. राजा मुळे माझी आणि तिची ओळख झाली. मी, राजा, राणी आणि तिच्या दोन मैत्रीणी असा आमचा चांगला ग्रुप तयार झाला होता. इतर कोणाला आम्ही ग्रुप मधे घेतलेच नाही. क्लास सुरू व्हायच्या आधी आणि सुटल्या नंतर आम्ही क्लासच्या बाहेरच्या कठ्ठ्यावर गप्पा मारता बसायचो. एक गोष्ट आमच्या नजरेतुन सुटत नव्हती ती म्हणजे राजा चे राणी कडे बघणे आणि राणी ने त्याला प्रतिसाद देणे. त्यावेळचे प्रेम आता सारखे फास्ट फॉरवर्ड नव्हते. त्यावेळेला नजरेवरच सगळी भिस्त असायची. मेसेजेस पोचवायला एक तर मित्र मैत्रिणी नाही तर लायब्ररीची पुस्तके. मोबाईल काय असते हे तर दूरदूर पर्यंत माहित नव्हते. घरात एखाद्याच्याच घरी एमटीएनल चा फोन असायचा आणि पूर्ण चाळी ची भिस्त त्या नंबर वर असायची. फ्रेंडशिप डे, वॅलेन्टाईन डे वगैरे गोष्टी अजुन सातासमुद्रापारच होत्या. त्यामुळे एखादी मुली बरोबर मैत्री करायची असेल तर डेरिंग करण्याशिवाय पर्याय नसायचा अन्यथा मुलगी डेरिंग करून रक्षा बंधन ला राखी बांधायला यायची.
तर अश्या जमान्यात राजा आणि राणी च्या कच्च्या प्रेमाचे अंकुर फुटत होते. गप्पा मारताना हळूच एकमेकांकडे बघुन हसणे, डोळ्यांच्या खाणाखूणा होणे, गप्पा मारताना दोघांचे एका विषयावर एकमत होणे आणि उस्फुर्तपणे टाळी देणे, टाळी दिल्यावर रानीचे हळूच लाजून मान खाली घालणे, क्लास मधे आल्यावर पहिले एकमेकांना शोधणे आणि नेहमीच्या जागेवर दिसले नाही तर चेहर्‍यावर चलबिचल होणे. कधी राजा उशिरा आला की रानीचे क्लास च्या दरवाज्याकडे एकटक बघत वाट पहाणे आणि राजाने आत प्रवेश केला की दोघांची नजरानजर होणे, मग राजा आत येऊन जागेवर बसे पर्यंत राणी त्याच्याकडे पाहत राहायची. एकदा राजा बसला की मग तो राणी कडे पाहायचा. मग राणी खुणेनेच विचारायची, ‘ का रे? एवढा उशीर का झाला?’ राजा मग मान हलवून डोळ्याच्या पापण्याची उघडझाप करून सांगायचा, ‘ काही नाही ग! असचं !”. मग क्लास चालू असताना एकमेकांकडे लक्ष नसताना बघणे आणि चुकूनमाकून नजरानजर झाल्यावर माना खाली घालून हसणे. हे लगेच आम्हाला समजून येऊ लागले होते. पण कोणी च काही बोलता नव्हते. आम्हां सगळ्यांना त्यांची जोडी आवडत होती पण जो पर्यंत त्यांच्या मनातले समजत नव्हते तो पर्यंत आम्हाला पुढाकारही घेता येत नव्हता.
तरी आम्ही त्यांना सपोर्ट करायला कधीच सुरुवात केली होती. ग्रुप मधे बसलो असताना आम्ही खास करून दोघांना एकमेकांच्या बाजूला बसायला जागा द्यायचो. तेव्हा राजाच्या होणार्‍या ओझारत्या स्पर्शाने राणी ची कळी खुलायची आणि तिचे गोरे गाल लाल टमाटर सारखे होऊन जायचे. तर तिचे लाजणे बघुना राजा ची स्वारी एकदम खुष होऊन जायची. क्लास सुटल्यावर आम्ही सगळे जण राणी च्या घरापर्यंत चालत जायचो. एक एक मैत्रिणी ला सोडत सर्वात शेवटी राणी चे घर यायचे. मुद्दाम आम्ही मोठा वळसा घालून तिच्या बिल्डिंग पर्यंत पोहचायचो. एकदा का मैत्रीणी गेल्या की मग राजा आणि राणीच चालायचे. मी राजाची सायकल घेऊन बाजूने चालायचो. जेणे करुन दोघांना एकांत मिळावा पण एवढे पण बाजूला नाही चालायचो की जेणे करून इतर लोकांना संशय येईल. चालताना एकमेकां कडे बघणे, गप्पा मारताना ओठांपेक्षा डोळ्यांनी जास्त बोलणे हे सारे आम्हांला समजू लागले होते. त्यांना वाटायचे आम्हाला कोणी बघितलेच नाही आणि आम्ही ही त्यांना तसे कधी जाणवू दिले नाही. राणीला घरी सोडल्यावर राजा मला डबल सीट घेऊन माझ्या बिल्डिंग च्या मागच्या गल्लीत सोडायचा आणि मग निघून जायचा.
आमच्या नजरे समोर त्यांचा प्रेमाचा वृक्ष बहरू लागला होता. पण दोघांनी एकमेकांना अजूनही मागणी घातली नव्हती की एकमेकांच्या निदर्शनासही आणून दिले नव्हते. एके दिवशी आम्ही राणी ला तिच्या बिल्डिंग जवळ सोडून माझ्या घरी परतत होतो तेव्हा राजाने न राहवून मला विचारले, ‘ अरे यार ! आज काल मला कसे तरीच होते आहे. राणी ला घरी सोडले की जिव कासावीस होऊन जातो रे. रात्री पण तिची खूप आठवण येते. मग तिच्या दिलेल्या नोटस घेऊन झोपतो. तेव्हा कुठे झोप येते. काय होतेय तेच समजत नाही…तिला पण असेच होत असेल का रे?’ मी म्हटले, ‘मित्रा! तुला बहुतेक प्रेम झालेय. तिच्या मनात काय आहे ते आपण उद्दया विचारूया. आता घरी जा.’ दुसर्‍या दिवशी तो लवकरच आला पण त्याला तिला विचारायचा धीर च नाही झाला. मी म्हटले, राहू दे, जसे चालले आहे तसे चालु दे. २/३ महिने असेच उलटून गेले. दोघांनी एकमेकांना काही प्रेमाची कबुली दिली नाही. सर्व नेहमी सारखेच चालले होते. पण बेचैनी वाढत होती. शेवटी राजा ने डेरिंग करायची ठरवली आणि मागणी घालायची ठरवली. खूप विचाराअंती असे ठरले की तिला एक चिठ्ठी लिहायची. आणि क्लास सुटताना तिच्या हातात द्यायची आणि निघुन जायचे. तिला विचार करायला वेळ द्यायचा आणि दुसर्‍या दिवशी भेटायचे. मोठ्या मुश्किलीने पत्राचा मायना सुचला आणि राजाने पहिले प्रेमपत्र लिहिले. दोन दिवस तो चिठ्ठी घेउन तसाच फिरत होता. डेरिंग च होत नव्हती.
चवथ्या दिवशी तो क्लास मध्ये लवकरच आला. थोडा टेंशन मधे दिसता होता. मला वाटले की प्रपोझ करायचे आहे म्हणून टेंशन आहे. मी विचारले काय झाले तर म्हणाला, अरे यार! आज ती शाळेत आलीच नाही रे. खूप दिवस बेकार गेला. तिच्या बिल्डींग खाली एक चक्कर मारुन आलो तर ती गॅलरी मधे दिसली पण तिने बघुन सुद्धा न बघीतल्यासारखे केले आणि न हसताच आत निघून गेली. असं कधीच झाले नव्हते रे!!! काय झाले तिला? तिला समजले असेल का मी तिला प्रपोझ करणार आहे ते? म्हणुन रागवली आहे का?
मी म्हटले, ‘रिलॅक्स !!! शांत हो टेंशन नको घेऊस, ती आता क्लास ला येतेय का बघुया मग काय ते समजेल.’
आम्ही तिची वाट बघत क्लासच्या बाहेर उभे राहिलो. थोड्या वेळाने ती आली पण एकच नजर टाकली आणि निघून गेली. नेहमीसारखे हाय नाही की चेहर्‍यावर हसू नाही. चेहरा खूप लाल झाला होता. डोळे सुजले होते. बहुतेक खूप रडली होती. तशीच न बोलता जाग्यावर जाउन बसली होती. आम्ही पण जाउन बसलो. कधी एकदा क्लास संपतो आणि तिच्याशी बोलतोय असे राजाला झाले होते. शेवटी कसा बसा क्लास संपला पण आमचा ग्रुप तसाच बसुन राहिला होता. ती पण तशीच बसली होती. मी त्याच्या हातात चिठ्ठी कोंबली आणि लांब जाउन बसलो. तिच्या मैत्रीणी पण लांब जाउन बसल्या. राजा उठला आणि तिच्या जवळ गेला. हातातली चिठ्ठी तिच्या हातात देण्यासाठी तिचा हात हातात पकडला आणि तिच्या हातात चिठ्ठी देण्यासाठी तिची मुठ उघडली तर तिच्या हातात अगोदरच एक चिठ्ठी होती. तिने खुणेनेच सांगितली की ती तुझ्या साठिच आहे. राजा ने आपली चिठ्ठी तिच्या हाताता दिली आणि तिची चिठ्ठी हातात घेतली. थरथरत्या हाताने चिठ्ठी उघडली भडाभडा वाचली आणि आनंदाने उडीच मारली. आणि माझ्या कडे बघुन तिच्या चिठ्ठीचे चुंबन घेतले. तिने पण चिठ्ठीत तेच लिहिले होते आणि त्याला प्रेमाची मागणी घातली होती. तो खूप खुश झाला आणि आमचे टेन्शन कमी झाले. काय पण प्रेम म्हणावे. दोघांचे खरच एकमेकांवर मनापासून प्रेम होते. दोघांना पण एकाच दिवशी प्रपोझ करावासा वाटला.
दोघेही एकमेकांना आवडत होते. आम्ही खुप खुश झालो. पण राणी च्या मनात काही वेगळेच होते. तिने चिठ्ठी वाचली तिच्या चेहर्‍यावर हसु उमटले…डोळ्यात अश्रु आले. तशाच भरल्या डोळ्यांनी चिठ्ठी दोन्ही हातात घेउन ति राजा कडे दोन मिनिटे बघत राहिली आणि मटकन खाली बसली व शेवटी तिने थांबवून ठेवलेले अश्रू मोकळे केले आणि जोराने हुंदका फोडला. आम्हाला काय झाले समजलेच नाही आम्ही तिच्या जवळ गेलो आणि तिला शांत केले आणि विचारले. मोठ्या मुश्किलीने तिने हुंदका आवरला आणि राजा चा हात हातात घेतला आणि म्हणाली, “मी हि चिठ्ठी तुला दोन दिवसांपुर्वीच लिहिली होती पण द्यायला हिंमतच होत नव्हती. मला पण तु खुप आवडतोस रे! पण…..” आणि तिने एक मोठा पॉझ घेतला. हमसुन रडायला लागली.
ती पाच सेकंद पण आमच्या काळजाचा ठोका चुकवुन गेली. ती म्हणाली, ‘माझ्या बाबांची बदलीची ऑर्डर आली आहे. आम्हाला उद्याच ठाणे सोडून कोल्हापुरा ला जायचेय..” तिच्या एका वाक्याने आमच्या पायाखालची जमीनच सरकली. आता कुठे प्रेमाला सुरवात झाली होती आणि जुदाई पण आली. आम्ही कोणी काहीच बोललो नाही. पुढे काहि चर्चा करण्यात अर्थच नव्ह्ता. सर्व शांत झाले होते. तसेच क्लास मधुन बाहेर पडलो नेहमी प्रमाणे चालू लागलो. मी सायकल घेतली आणि पुढे पुढे चालू लागलो. एक एक करत सगळ्या मैत्रिणींना सोडले आणि तिच्या बिल्डींग खाली पोचलो. दोघे काही न बोलता तसेच बघत राहीले. कोणाला काही सुचतच नव्हते. मी शेवटी विचारले, ‘उद्या किती वाजता निघणार आहे.’
ती म्हणाली, ‘सकाळीच सहा वाजता सामान भरायला गाडी येईल आणि आठ वाजेपर्यंत निघुन जावू.’ तसच जड अंत:करणाने आम्ही एकमेकांचा निरोप घेतला.
राजा सायकल वर सोडायला आला. बिल्डिंगच्या मागच्या गल्लीत उतरलो आणि राजाने इतका वेळ थांबून ठेवेलेले मन मोकळे केले. अगदी मनसोक्त रडला. मी फक्त त्याच्या पाठीवर थोपटत राहिलो दुसरे काय करू शकणार होतो. त्याच्या जागी जर मी असतो तर कदाचित मी काहीं वेगळे नसते केले. रडण्याचा भर ओसरल्यावर मी त्याला विचारले की तू जाणार आहेस का सकाळी? तो नाही म्हणाला. मला तिला सोडून जाताना बघवणार नाही…. ‘अरे पण ती वाट बघत राहिली तर?’ मी म्हणालो. ‘नाही बघणार आणि वाट बघितली तरी ती समजून जाईल.’ असे म्हणून त्याने खिशातली चिठ्ठी काढली आणि परत परत वाचत रडत राहिला.
पुढचे ४/५ दिवस राजा क्लासला आलाच नाही. मित्राकडे विचारले तर म्हणाला कि राजा शाळेत पणा नाही आला होता.. कदाचित तब्येत बरी नाही. विचार केला आज संध्याकाळी त्याच्या घरी जाउन बघुया. क्लास सुटल्यावर त्याच्या घरी गेलो. हा शांतापणे चादर घेऊन गादी वर पडला होता. आई ने सांगितले, ‘अरे दोन दिवसापासुन तब्येत बरी नाही. काही खातच नाही आहे. डॉक्टरांकडे घेऊन गेली तर ते म्हणाले काही झाले नाही…पण दिवसरभर झोपुनच आहे.’ मी त्याच्या बेड जवळ गेलो, त्याच्या डोक्यावरची चादर खाली केली. गोरा चेहरा लाल लाल झाला होता. कदाचित घरातल्यांची नजर चुकवून खूप रडला असावा. उशी पण ओली झाली होती रडून रडून.
मी विचारले…काय झाले?
‘काही नाही रे… तुला माहीत आहे ना.’ राजा म्हणाला.
‘तू गेला होतासा का तिला सकाळी निरोप द्यायला?’…मी
‘हो गेलो होतो. पण तिच्या समोर नाही गेलो. झाडामागुनच बघत होतो. ती खूप शोधता होती रे मला. सारखी माझ्या बिल्डिंग कडे बघत होती तिला वाटले होते की मी येईन. मला समोर जायची डेरिंग च नाही झाली. कदाचित गेलो असतो तर मला रडणे थांबवता आले नसते. शेवटी ती गाडीत बसली. तेव्हा मी झाडामागून बाहेर आलो आणि गाडी चालू झाल्यावर तिला हात दाखवला. कारण ती गाडी थांबवू शकत नव्हती हे मला माहित होते’ ‘तिने मला व मी तिला शेवटचे बघितले आणी हात उंचावुन टाटा केला…तिने पण केला…डोळ्यात पाणी असल्यामुळे तिचा चेहराच बघू नाही शकलो रे. आता ती कधीच भेटणार नाही ह्याचे खूप दु:ख वाटतेय रे…मन नुसते तुटतयं, छातीत एक असह्य कळ येतेय. मी तिच्या समोर नाही आलो म्हणुन कदाचित रागावली असेल ना रे?’
सगळा प्रसंग माझ्या डोळ्यासमोरुन गेला आणि हलकेच डोळ्यात पाणी उभे राहिले. मी चेहरा बाजुला करुन पाणी टिपले आणि त्याचा हात हातात घेऊन म्हणालो, ‘उद्या शाळेत जा, क्लासला यायला सुरवात कर जरा बरे वाटेल’.
राजा मग पुढे एक आठवडाच च क्लासला आला. तिच्या रिकाम्या जागेकडे बघुन ढसाढसा रडायचा. तिची खुप आठवण यायची म्हणुन त्याने क्लासच सोडून दिला. मला कधी कधी भेटायचा चेहर्‍यावरचे सर्व तेजच निघून गेले होते. हसणे तर विसरल्यातच जमा होते. पुढे त्याच्या वडिलांची पण बदली झाली आणि तो पुण्याला गेला. जाताना भेटूना गेला, म्हणाला, पुण्या पासून कोल्हापूर जवळ आहे, कधी तरी जाउन येइन. बघू नशिबात असेल तर भेट होईल.

मैत्रिण


कुर्ला - हावडाच्या मासळीच्या वासाने भरलेल्या डब्यातला १४ तास प्रवास आणि पुढे धामणगाव ते घाटंजी २ सीटवर तिघांनी बसून केलेला बिड्यांच्या धुरात केलेला ३ तासाचा प्रवास... अगं आई गं... मला अक्षरशः जीव नकोसा झाला होता. त्या गर्दीतून दोन जड बॅग्ज कुणालाही लागू न देता बसबाहेर कश्याबश्या काढल्या आणि मोकळ्या हवेत श्वास घेतला. ऑटोत बॅग टाकून त्याला "ग्रीन कॉलनी" सांगितले आणि जरा मागे रेललो.

ही माझी नोकरी लागल्यानंतरची पहिली दिवाळी. साहजिकच सर्वांसाठी काहिनाकाही घेतल्यामुळे बॅग्ज जड झाल्या होत्या. खड्ड्यातून उसळणाऱ्या ऑटोतही त्यांना सांभाळणे कठिणच होते.

"इतक्या लौकर रस्ता खराब झाला ? " मी ऑटोवाल्याशी काहीतरी बोलायचे म्हणून विचारले.

"कापसाच्या गाड्या जातात ना, ते रस्त्याची वाट लावतात. इथं सिमेंट रोड जरी बनवला तरी काही उपयोग नाही" त्याने उत्तर दिले. शेवटी एक गचका देऊन ऑटो बंद पडला तो माझ्या घरापुढेच.

"विजुकाका.... " मैथिली ओरडतच बाहेर आली. मी ऑटोतून सामान काढलं तशी ती मला बिलगली. मग माझ्या घरात जात ओरडली, "आज्जी.... विजुकाका आला.... ". मग पुन्हा बाहेर येऊन स्वतःच्या घरी जात पुन्हा ओरडली, " आई, विजुकाका आला गं..... ".

मी घरात सामान ठेवेपर्यंत आई पाणी घेऊन आली होतीच. मी पाणी पिलं आणि "गरम पाणी आहे का, अंघोळ करतो, मगच बरं वाटेल" असं म्हणालो.

"आधी चहा घे मग कर अंघोळ" आईने आल्याआल्या सूचना दिली.

"हं. ठीक आहे" असं म्हणत मीही स्वैपाकखोलित शिरलो.

"बाबा कुठे गेले? " मी चौकशी केली.

"गेले संजुकडे, सत्यनारायणासाठी. तू आधी कळवलं असतं तर थांबले असते"

"हं. संजुताईकडे आहे हे माहीत असतं तर आधी तिच्याचकडे गेलो असतो. यवतमाळवरुनचतर आलो मी."

"येतीलच उद्या सकाळी". असं म्हणत मला चहा दिला.

मी चहा घेऊन अंघोळ उरकली. देवाला आणि आईला नमस्कार केला, तशी मैथिली आली. तिने माझ्यासोबत जेवण उरकलं आणि मी आडवा झालो. प्रवासाच्या थकव्यामुळे मला गाढ झोप लागली ती साडेपाचपर्यंत.

जेंव्हा आईनं उठवलं तेंव्हा डोळे जड झाले होते.

"मी जरा देवळात जाऊन येते. बाहेर जाशील तर कुलूप लावशील, ही घे चाबी. " असं म्हणत हातात चाबी ठेवली. मी अर्धवट झोपेत हूं. हूं.. करत होतो.

"नीट लावशील कुलूप..... अरे हो तुला सांगायचंच राहिलं होतं.... तुझी ती मैत्रीण येऊन गेली इथे, आठ दिवस खूप छान गेले आमचे .... फार गोड पोरगी आहे ती... बरं चल मी निघते....." बाहेरून मैथिलीचा आवाज आला, आणि मग मैथिली "चल ना गं आज्जी लौकर" म्हणत तिला ओढत घेऊन गेली.

मी पुन्हा डोळे मिटले. ५ मिनिट झाले असतील कदाचित, मी एकदम खाडकन उठलो. "माझी मैत्रीण ? आणि इथे ? घाटंजीत येऊन गेली ?" मी फाटकापर्यंत धावत गेलो पण आई निघून गेली होती.

"छ्या ! मी काहीतरी उगाच ऐकलं असेल... " असा विचार करून मी फ्रेश झालो. संध्याकाळी गावाबाहेर फिरायला जाणे हा माझा घाटंजीत असतांनाचा नेहमीचा क्रम होता, पण मुंबईत गेल्यापासून जरा फिरणं कमी झालं होतं. मी गावाबाहेर आलो. इथे एक गणपतीचं छोटसं मंदिर आहे. याच्या मागच्या बाजूला गव्हाचे शेत आहे. तिथून येणारी थंडगार झुळुक अंगावर घेतली की मन शांत वाटते. माझे डोळे आपोआप मिटले. माझी छान समाधी लागली होती.

"हाय ! " कुणीतरी म्हणालं तसं मी भानावर आलो. बघतो तर काय पुढे रवी उभा. माझा बालमित्र.

"अरे तू कुठे ? "

"यवतमाळला जाऊन येतो. ताईला आणायचं आहे. "

"अच्छा! "

"चल निघतो" त्याने कॅलिबरला किक मारली आणि गिअर टाकत म्हणाला, " अरे हो, तुझी मैत्रीण छान आहे यार. मस्त गप्पा मारल्या आम्ही"

"माझी मैत्रीण ? " मी काही पुढे बोलायच्या आतच तो निघून गेला.

"म्हणजे आई म्हणाली होती ते खरं होतं तर.... पण माझी कोणती मैत्रीण आली होती? आई म्हणाली की चार- आठ दिवस राहून गेली. इतक्या जवळची तर कोणीच नाही... आणि रवीशी गप्पा.... ज्याला आजपर्यंत कोणत्याही मुलीशी बोलणं जमलं नव्हतं तो गप्पा मारल्या म्हणतोय .... आहे तरी ही कोण.... आणि घाटंजीसारख्या छोट्याश्या गावात आठ दिवस .... नक्की गडबड आहे...... " मी विचार करतच घर गाठलं. मनात प्रत्येक मैत्रिणीबद्दल विचार करणं चालू होतं.
***************************************************

"आई, माझी कोणती मैत्रीण आली होती गं? " मी घरात शिरतच पहिला प्रश्न विचारला.

"वांग्याची भाजी खाशील ना? " सरळ उत्तर देईल ती आई कसली.

"हो" मी बोलून गेलो. तसही घराबाहेर राहिलं की कोणतीही भाजी सारखीच लागते. ती स्वैपाकघरात शिरली, तसा मी ही तिच्यामागे गेलो आणि डायनिंग टेबलवर बसलो.

"माझी मैत्रीण आली होती म्हणे! " मी पुन्हा मुळपदावर आलो.

"हो. अरे ती अमरावतीची नाही का... " तीला नाव आठवत नव्हतं.

"राणी, मुग्धा, पल्लवी, रोशनी, प्रीती, माधवी, सुधा, स्वाती.... " मी तिच्यासमोर लिस्टच वाचली.

"नाही रे, ह्या सगळ्या माहीती आहे मला. "

"मग कोण? "

"हं, आठवलं... श्रुती... किती गोड नाव आहे नं? "

"गोड... हुं... " मी स्वतःशीच बोललो. कारण ह्या नावाची माझी कोणी मैत्रीण आहे हे मला आठवतच नव्हतं. पण 'श्रुती' माझी कोणी मैत्रीण असू शकते, असही मला मनात वाटलं. कोणाला नाही आवडणार, अश्या नावाची मैत्रीण असायला.

"तिचं आडनाव, पत्ता, फोन, काही...? "

"ती तुला निवडुंगची हिरोईन आठवते... "

"अरे देवा, ही आई म्हणजे नं" मी मनाशी म्हणालो. आईला मध्येच काहीही सुचते.

"तीचा काय संबंध? " मी नाराजीने म्हणालो.

"अरे तिचं आडनाव तेच आहे"

"अच्छा! असं होय. " मी आता मात्र आईचं मनात कौतुक केलं. नशिब की मी 'निवडुंग'चा फॅन होतो. पण ही श्रुती जोगळेकर कोण, हे मला अजून समजलं नव्हतं. पण हे आईला कसं विचारणार?

"ती कशी काय आली होती गं? " मी जसं काही तीला लहानपणीपासून ओळखतो, अश्या थाटात मी विचारलं.

"अरे तीच एम.फिल. का पी.एच.डी.च काहीतरी रीसर्चच काम होतं. मला काय समजते त्यातलं. "

"रीसर्च? " मला आश्चर्य वाटलं.

"हो. तुझ्या कॉलेजच्या लायब्ररीत जाउन अभ्यास करत होती. बाबांनी ओळख करून दिली होती लायब्ररिअनची. "

मला आता आश्चर्य वाटल ते आमच्या कॉलेजचं. तशी आमच्या कॉलेज लायब्ररीत अगदी एम. एस्सी. ला वापरता येतील अशी दर्जेदार पुस्तकं होती. मी स्वतः एम. एस्सी. ला असतांना वापरली होती, पण रिसर्च... कमाल आहे...

"तिने फोन नंबर दिला का ग? " काही क्लू मिळावा म्हणून विचारलं.

"आहे ना, बाबांच्या डायरीत... " भाजीला फोडणी देत ती म्हणाली. मला एकदम ठसका बसला, फोडणीचा नव्हे डायरीचा. कारण बाबा प्रत्येक नवीन डायरी त्यांच्या जुन्यापुराण्या लेदर-बॅगमध्येच ठेवायचे. बारश्यापासून ते तेरवीपर्यंत कोणताही प्रसंग असो, सगळीकडे ती लेदर-बॅग त्यांच्या सोबतच राहणार.

"हुं. डायरीत.... " मी निराशेने म्हणालो. अन मला एकदम आठवलं, एम. एस्सी. ला असतांना डायऱ्या लिहायचो. आता आईने त्या डायऱ्या कुठे ठेवल्या देव जाणे. आईला विचारलं तर म्हणाली, असतील तिथेच.

आमच्याकडे बाबांचे इंग्लिश, संजुताईचे मराठीचे, मंजुचे बायोलॉजी तर माझे फिजिक्सचे असे मिळून दोन-अडिचशे पुस्तकं असतील. नोटस, झेरॉक्स वेगळ्याच! बॉक्सचा दीवाण पुर्ण या पुस्तकांनिच भरला आहे, त्यातच बिचाऱ्या माझ्या डायऱ्या कुठेतरी पडल्या असतील. अर्धा तास शोधाशोध केली तेंव्हा चारही डायऱ्या सापडल्या. त्यावरची धुळ झटकली आणि पहिली डायरी हातात घेतली तर आईची जेवायची सुचना. कसंबसं जेवण उरकलं आणि पहिली डायरी हातात घेतली. मी एम. एस्सी. ला ऍडमिशन घेतली त्यादिवशी भेटलेला मुकेश, स्वाती आणि अजय... दोन-चार पानं झाली नसतील तोच लाईट बंद. काही बोललो तर, आई म्हणाली, झोप आता. आजच आलाय, उद्या वाच आता. "

दातात फसलेला आंब्याच्या कोयीचा केस जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत मन त्यातच अटकून राहतं तसच माझं झालं होत. मी रात्रभर विचार करत होतो, ही श्रुती जोगळेकर कोण?

****************************************************
दातात फसलेला आंब्याच्या कोयीचा केस जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत मन त्यातच अटकून राहतं तसच माझं झालं होत. मी रात्रभर विचार करत होतो, ही श्रुती जोगळेकर कोण?

साहजिकच रात्री उशिरापर्यंत जागल्यामुळे सकाळी उशिरा उठलो. चहा-नाश्ता उरकून पुन्हा पहिली डायरी हातात घेतली तर मैथिली आली.

"तू अजून आंघोळ नाही केली? यॅक बापा... मी पहा, पहिला नंबर तु कातीन किडा... " असं म्हणत जोरजोरात हसू लागली. तितक्यात आईने 'पाणी गरम झालय रे, अंघोळ उरकून घे' असं म्हणताच 'माकडाच्या हाती कोलित'च मिळाल. मी स्वैपाकघरात शिरलो तर आई ओवाळायची तयारी करत होती.

"ओवाळायचं? आजच? दिवाळीला अजून २ दिवस आहेत न ? "

"आता तु येतोच किती दिवसासाठी ? म्हणतात ना 'साधु-संत येती घरा तोची दिवाळी-दसरा' तसच आता तुझ्या बाबतीत म्हणाव लागेल"

"आज्जी ! विजुकाका साधु-संत झाला ? मला माहितीच नव्हतं. श्रुतीताईला तर मी हे सांगितलच नव्हतं" असं म्हणत ती फिदीफिदी हसू लागली. पुन्हा एकदा श्रुतीचं नाव आलं अन माझं डोकच तडकलं. एकतर ही श्रुती कोण हे अजून मला समजलं नव्हत आणि ही पोरगी मला अजून चिडवत होती. मी तिला पकडायला धावलो पण ती पळाली.

मी कशीबशी अंघोळ उरकली आणि अथर्वशीर्ष उरकून डायरी हातात घेतली. एक डायरी संपेपर्यंत जेवणाची वेळ झाली होती. पण श्रुतीचा पुसटसाही उल्लेख त्या डायरीत नव्हता. जेवण झालं आणि मी अधाश्यासारखी दुसरी डायरी हातात घेतली, तोच रवीचा आवाज आला. मलाही त्याच्याशी खुप गप्पा करायच्या होत्या. मुंबईत मी केलेल्या धमाल मजा सांगायच्या होत्या, पण झालं उलटच. माझी जुजबी चौकशी करून त्याने विचारले,

"श्रुतीला फोन केला की नाही ?"

"नाही, फोन नंबर बाबांजवळ आहे. " मी नाराजीने म्हटले.

"अच्छा. पण बाकी काही म्हण ही तुझी मैत्रिण खुप बोलकी आहे. अरे मी तिच्याशी केंव्हा गप्पा करायला लागलो मलाच कळल नाही. " त्यानंतर त्याचं जे 'श्रुती-पुराण' सुरू झालं, की बस रे बस... मी मात्र मलाच माहिती नसलेल्या मैत्रीणीबद्दल 'हुं हुं' करत होतो. त्यात भर पडली ती माधुरीवहिनींची. त्यांना म्हणे त्यांची कोणी जुनी मैत्रीणच भेटल्यासारखी वाटत होती. त्यात आमच्या मांसाहेबांची भर. 'हो ग ! किती गोड पोरगी आहे ती'. मी कितीही डोकं खाजवलं तरी मला कळत नव्हतं ही कोणती माझी मैत्रीण आहे. त्यात शेजारी-पाजारी मला माहीती नसलेल्या माझ्या मैत्रिणीचे गोडवे गात होते. त्यामुळे माझी अधिकच चिडचिड होती होती. कॉलनीत फिरणंसुद्धा कठीण झालं होतं. चला आज बाबा येणार होते. त्यांच्या डायरीतला तिचा पत्ता आणि फोन नंबर पाहीलं की कदाचित आठवल मला. बाबा आले की त्यांना सरळ डायरी मागायची आणि फोन करून या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावायचा असं मी ठरवलं. पण अजून बाबा आले नव्हते. आज संध्याकाळी फिरायला जायच रद्द करायचा विचार होता पण माधुरीवहीनी, नंदुभाउ उगाच मला त्रास देतिल असं वाटलं म्हणून मी बाहेर पडलो.

रात्री आठला परत आलो तरी बाबा आले नव्हते. पुन्हा मी उरलेल्या डायऱ्या काढल्या आणि वाचायला सुरुवात केली. रात्री पावणेबारा वाजले तेंव्हा दार वाजलं. बाबा आले होते. गाडी मध्येच बिघडल्यामुळे आणि दिवाळीच्या गर्दीमुळे दुसरी गाडी न मिळाल्यामुळे उशिर झाला होता. आता इतक्या रात्री त्यांना डायरी मागणं मला प्रशस्त वाटलं नाही. आणि नंबर मिळुनही इतक्या उशीरा फोन थोडीच करणार होतो?

ती ही रात्र तशीच गेली. दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा मी आळश्यासारखा १० वाजता उठलो. बघतो तर काय बाबा पुन्हा गायब ! मला वाटलं बाजारात गेले की काय. आईला विचारलं तर म्हणाली,

" अरे अंजीचे पांडे माहीती आहे न तुला ?"

" त्यांचं काय? " आईची गाडी पुन्हा भरकटली की काय असं मला वाटलं.

"त्यांचा मुलगा आला होता. लग्नाची बोलणी करायची आहे आणि मुहुर्त काढायचा होता म्हणून गाडीवर घेउन गेला, येतील जेवायच्या वेळेपर्यंत ! "

मी एक मोठा सुस्कारा सोडला. त्यापेक्षा जास्त मी त्यावेळी काहीही करू शकत नव्हतो. मी चहा घेउन उरलेली माझी अर्धी डायरी संपवली. चार डायऱ्या, फोन नंबरच्या डायऱ्या, माझी डिजिटल डायरी सगळं काही शोधून झालं. इतकच नाही तर दोन - चार एम. एस्सी. च्या मित्रांनाही फोन करून झालं, पण श्रुती कोण हे मला अजुनही समजलं नव्हतं.

जेवायच्या वेळेपर्यंत बाबा आलेच नाही, त्यामुळे माझी चिडचिड अधिकच वाढली होती.

" करा , दुसऱ्यांच्या मुलांचे लग्न करा, त्यांच्या घरी बारश्याला जा.... स्वतःचा मुलगा लग्नाचा झालाय हे काय मी सांगायचं का?" मी मनाशीच बडबड करत होतो. शेवटी मला न आवडणारी भेंडीची भाजी खाल्ली हे मला भाजी संपल्यावर कळलं. शेवटी मी फस्ट्रेट होउन झोपून गेलो. रात्री झोप न झाल्यामुळे कदाचित असेल, मला गाढ जोप लागली. मी उठलो तेंव्हा ५ वाजले होते. बाबा चहा घेत होते. मलाही चहाची खुप गरज होती. चहा घेता-घेता बाबांनी लग्नाच्या बोलणीत झालेली गंमत सांगितली तसं मी पोट धरून हसू लागलो. अचानक बाबांना काहीतरी आठवलं. त्यांनी स्वतःची बॅग काढून डायरी माझ्यासमोर धरली. ते नंदुभाऊंनी बघितलं. त्यांनी चान्स सोडला नाही.

"डायरी मिळाली वाटते. "

मी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. 'जे' च पान काढलं. त्यात काळ्या शाईच्या पेनने टपोऱ्या मोत्यासारख्या अक्षरात लिहिलं होतं, "कु. श्रुती अरुण जोगळेकर ", पुढचा पत्ता वाचताच मी अधिकच गोंधळात पडलो. "बुधवारा, अमरावती".

'बुधवारा', अमरावतीचा अतिशय जुन्या वस्तीचा भाग. या भागात नवीन व्यक्तीला एखाद्याच्या घरी जातांना जसा पत्ता विचारावा लागतो तसा तिथून परत येतांनाही विचारावा लागतो इतका गल्लिबोळाचा भाग. अमरावतीला चार वर्ष होतो पण या भागात कधी जायचं कामही पडलं नाही, आणि इच्छाही झाली नाही.

मी अमरावतीच्या सगळ्या मैत्रीणींकडे कोणत्या ना कोणत्या कारणाने जाउन आलो होतो, पण बुधवाऱ्यात जायच कधिच काम पडलं नव्हतं. पत्ता मिळुनही, माझा प्रश्न तसाच होता,

"ही श्रुती जोगळेकर कोण?"
***************************************************
" बाकी काही म्हणा, विजू आल्यापासून काकु फ्रेश दिसत आहे, नाही का माधुरी ? " नंदुभाऊंनी म्हटले.

" मग काय ? एकुलता एक लेक आहे तो. तसही श्रुती गेल्यापासून काकुंना करमत नव्हतं" वहीनी म्हणाल्या.

" खर आहे ग तुज. लळा लावला पोरिनं ८ दिवसात. फारच गोड पोरगी आहे" आई एकदम तिच्या आठवणींनी भावुक झाली होती.

"पण ही श्रुती आहे तरी कोण ? " माझ्या तोंडून अचानक निघून गेलं.

"घ्या. म्हणजे आता तुला हे ही आठवत नाही ? " बाबा म्हणाले.

"अरे ती तुझी मैत्रीण आहे न ? " आईने घाबरून विचारलं.

"मला नाही माहित. " मला काय बोलाव ते सुचलच नाही.

"म्हणजे तुला हे म्हणायचं आहे की तु तिला ओळखत नाही ? " नंदुभाऊ वकिलासारखे विचारू लागले.

"मी खरच तिला नाही ओळखत "

"मग ती इथे कशी आली? आणि तिला तर तुझ्याबद्दल सगळच माहिती होतं, अगदी नाटकं, क्विझ, इलेक्क्षन, सगळं काही. तुला आठवत नसेल कदाचित" आई म्हणाली.

"नाही ग आई, मी खरच ओळखत नाही तिला. मी माझ्या सगळ्या डायऱ्या बघितल्या, माझ्या मित्रांनासुद्धा विचारलं. " माझा आवाज रडवेला झाला होता.

आता मात्र आई-बाबा घाबरले. माझी मैत्रीण म्हणून आलेली मुलगी होती तरी कोण ? त्यांनी १५-२० मिनिटं वेगवेगळे प्रश्न विचारून मला भंडावून सोडलं. त्यांचा माझ्या बोलण्यावर विश्वासच बसत नव्हता.

"आता मी काय करू म्हणजे तुमचा विश्वास बसेल? " मी शेवटी चिडून म्हणालो.

"फोन कर" वहिनी म्हणाल्या.

"फोन ? कुणाला ? "

"श्रुतीला. "

"आणि काय बोलु? "

"तू फोन तर कर, कदाचित तिच्याशी बोलल्यावर आठवेल तुला. "

मला हे पटलं. मी फोन लावला.

"नमस्कार, जोगळेकर बोलतोय" तिकडून एक जाडाभरडा आवाज आला.

"नमस्कार. मी विजय देशमुख बोलतोय, घाटंजीवरुन. श्रुती आहे का ? "

"एक मिनिट हं विजयराव" मला त्यांनी विजय'राव' म्हटलं याचं आश्चर्य वाटलं. माझा आवाज चाळीशीचा वाटला की काय ?

"हॅलो" पलिकडून एक नाजुक आवाज आला.

"हॅलो श्रुती मी विजय बोलतोय, घाटंजीहुन" मी कसाबसा बोललो.

"अय्या तुम्ही ! तुम्ही कधी आलात ? " आता आश्चर्यचकीत होण्याची माझी पाळी होती.

"झाले २ दिवस"

"२ दिवस आणि आत्ता फोन करत आहे? " काय चालयय हे, हि पोरगी अशी काय बोलतेय, मी अजुनच गोंधळात पडलो.

"नाही म्हणजे तुझा नंबर बाबांजवळ होता आणि बाबा बाहेरगावी गेले होते म्हणुन.... "

"अस्सं, ठीक आहे"

"श्रुती, मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं" मी मुळ मुद्द्यावर आलो.

"मलाही तुमच्याशी खुप बोलायच आहे पण मला आत्ता निघायला हवं. शरयुचा वाढदिवस आहे ना आज, म्हणून ती सगळ्यांना पिक्चरला नेतेय. सगळ्याजणी माझ्यासाठी थांबल्या आहे, मी जाउ? "

ही पोरगी इतकी लाडीक का बोलत आहे, आणि शरयू कोण, आणि मला जाउ म्हणून का विचारते आहे ? ही तर अशी बोलत आहे जसं काही माझं हिच्याशी लग्न ठरलं आहे. ओह माय गॉड, आई-बाबांनी मला न विचारता माझं लग्न तर नाही ना ठरवल? मी त्यांच्याकडे पाहिलं पण तसं काहिच मला जाणवलं नाही.

"आपण उद्या बोललो तर चालेल न ? " तिने पुन्हा विचारले.

"ठीक आहे, उद्या बोलु" असं म्हणून मी फोन ठेवला. 'पिक्चरला गेली, उद्या बोलेल' मी सर्वांना सांगितले.
***************************************************

तीही रात्र अशीच गेली. मात्र दुसऱ्या दिवशी मैथिलिने सकाळी सकाळीच त्रास देणे सुरू केले. जशी मांजर बिछान्यात घेउन घुसघुस करते तशी तिही घुसली आणि माझी झोप उडवली.

"लौकर ब्रश कर, आज मी तुला उटणं लावून तुला गोरगोरं करणार आहे" तीची ऑर्डर सुटली. पुढचा तास दिड तास तिच्या मस्तीतच गेला. पण मी तयार झालो तेंव्हा मला चांगलीच भुक लागली होती. किचनमध्ये बघितल तर काय....

आज वसुबारस. दरवर्षी वसुबारसला आई पांढऱ्या ज्वारीची भाकरी आणि वांगे-बटाट्याची रस्स्याची भाजी बनवते. माझ्या तोंडाला पाणी सुटलं. व्वा ! मी लगेच पानं घ्यायला सुरुवात केली. आई मला जेवायला वाढणार इतक्यात बाहेरून मैथिली ओरडतच आली.

"आज्जी, श्रुतीताई आली"

"श्रुती? " आईने आश्चर्याने विचारले.

"हो, श्रुतीताई आली' तिने पुन्हा एकदा धापा टाकत म्हटले. मी किचनमधुनच वाकून पाहिले. मधल्या दाराच्या पडद्यामुळे मला फक्त लॅवेंडर रंगाचा पंजाबी सुट दिसला. मी मधल्या खोलीत जाउन कपडे बदलले, केस नीट केले. भलेही मी ओळखत नसलो, तरी माझी मैत्रीण होती ती.

मी पाणी घेउन गेलो. बाहेर २२-२३ ची एक तरुणी आणि एक मध्यमवयीन गृहस्थ होते. ते म्हणाले,

"नमस्कार, मी अरुण जोगळेकर, आणि श्रुतीला तुम्ही ओळखताच. "

मी श्रुतीकडे बघितले, पण तिचा चेहरा ओळखीचा वाटत नव्हता. मलाच अवघडल्यासारखं झालं.

तितक्यात मैथिलीने नंदुभाऊंना आवाज दिला,

"मांडे सर तुम्हाला माझे आबा बोलवत आहे" ते ऐकून श्रुती एकदम गोड हसली. मला आईचं 'गोड मुलगी' हे विषेशण पटलं.

बाबांनी नंदुभाऊंची ओळख करून दिली, "तसे हे आमचे शेजारी पण आमच्यासाठी आमचा मोठा मुलगा".

"हो श्रुतीने सांगितलं मला".

" काय रे आता तरी ओळखलं की नाही."

"आय ऍम सॉरी पण मला... आय मीन मी... " मला काय बोलाव तेच सुचल नाही.

"नाही, तुम्ही मला ओळखत नाही, पण मी तुम्हाला ओळखते. " श्रुती म्हणाली. माझी स्मरणशक्ती चांगली असल्याबद्दल मला थोडं बरं वाटलं. पण बाबा नंदुभाऊ आणि मधल्या खोलिच्या दरवाजात्यात उभी असलेली आई, सगळेच चकीत झाले.

"तू मला ओळखते ? कसं काय? " मी विचारलं.

"मी स्वप्नाची, तुमच्या जुनिअरची मैत्रीण आहे."

स्वप्ना माझी जुनिअर असली तरी माझी बेस्ट फ्रेंड होती. रोज कोणत्या ना कोणत्या कारणाने आमचे वाद व्हायचे. खरं तर ती मुद्दाम वाद घालायची. म्हणायची "सर, तुमच्याशी वाद घातला की तुम्ही अजून ती गोष्ट पटवून देता, त्यामुळे मला आणखी काही नवीन गोष्टी कळतात." एम. एस्सी. नंतरही २ वर्ष मी तिथेच नोकरी केली, त्यामुळे ३ वर्षात आमची मैत्री अधिकच घट्ट झाली. माझ्या डोळ्यासमोरून ती ३ वर्ष सरकली.

"ती रोज मला तुमच्याविषयी सांगायची. तीच्या गप्पांमध्ये तुमचाच जास्त समावेश असायचा. पण मागच्या वर्षी तीच लग्न झालं आणि तुमच्याबद्दल माहीती मिळणंही बंद झालं. " श्रुती म्हणाली.

"स्वप्नाच्या लग्नानंतर श्रुतीच्या लग्नाचा विचार आमच्या मनात आला. तसे १-२ स्थळं होते पण श्रुतीनच नाही म्हटलं. जेंव्हा तीला आम्ही खोदून खोदून विचारल तेंव्हा आम्हाला तुमच्याबद्दल कळलं. तुमच्याबद्दल ऐकून तीला तुम्ही आवडायला लागले होते" जोगळेकर साहेबांनी पुढची माहीती पुरवली.

"मग तुम्ही सरळ 'प्रपोजल' का नाही पाठवलं? " बाबांनी माझ्या मनातला प्रश्न विचारला.

"विजयरावांना एम. एस्सी. फिजिक्सच झालेली मुलगी हवी होती, त्यामुळे आमचा नाईलाज झाला. "

मी लग्न करेन तर एम. एस्सी. फिजिक्स झालेल्या मुलीशीच करेन हे माझं एम. एस्सी. ला असतांनाच मत होतं. त्यावेळी तशी बरिच विचित्र मतं होती माझी, पण वयानुसार ती बदलत गेली होती. दुर्दैवाने हे स्वप्नाला आणि पर्यायाने श्रुतीला माहिती नव्हतं.

" श्रुतीपुढे एकच पर्याय होता तो म्हणजे तुमचे दोघांचे मन जिंकण्याचा. त्यामुळे ती एम. फील. च्या निमित्याने इथे आली आणि तुमच्यासोबत राहिली. आम्ही तिला ३-४ दिवसच म्हटल होत, पण तुम्ही आग्रहाने तिला १० दिवस ठेवून घेतलं. "

प्रेमापोटी तिने केलेले धाडस कौतुकास्पदच होतं.

"मग नंदु, काय करायचं ?" बाबांनी विचारलं

"मला असं वाटते.... " नंदुभाऊंनी उगाच लांब स्वर लावला, माझ्या हृदयाची धडधड वाढली.

" आपण आधी जेवणं उरकून घेउ... " हे ऐकून मी नि:श्वास सोडला.

मी आणि वहिनींनी भराभर पानं घेतले. मी श्रुतीच्या विरुद्ध बाजुला बसलो होतो. मध्येच तिचं लक्ष नाही असं बघून मी तिच्याकडे पाहिलं. तशी नाकी डोळी निटस असली तरी ती स्मार्ट होती. लॅवेंडर रंगाच्या ड्रेसमध्ये ती छान दिसत होती. लांब मोकळे सोडलेले केस, गहू वर्ण, गोल चेहरा, धनुष्याकृती भुवया, लहान मुलांसारखे गोबरे गाल, चाफेकळी नाक आणि गुलाबी ओठ, ज्यांना लिपस्टिकचा कधी स्पर्शही झाला नसावा.

"व्वा !" माझ्या तोंडून उद्गार निघून गेला तशी श्रुती माझ्याकडे संशयाने बघू लागली.

"भाकरीमुळे मजा आली, नाही का नंदुभाऊ" मी सावरत म्हणालो. तसा वातावरणात आलेला ताण कमी झाला. मग जेवणासोबत गप्पाही सुरू झाल्या.

जेवणानंतर जोगळेकर साहेब आणि बाबा त्यांच्या स्वस्ताईच्या जमान्यात रंगले तर मी बाहेरच्या बगिच्यात बसून श्रुतीला माझ्या मनातले प्रश्न विचारून घेतले. ती ही छान मोकळी बोलली.

आवराआवर झाली आणि पुन्हा बैठक बसली. जोगळेकर साहेब म्हणाले,

"विजयराव, माझ्या मुलीमुळे तुम्हाला जो मनस्ताप झाला त्यासाठी आधी मी तुमची माफी मागतो. "

"नाही नाही... अहो हे काय करत आहे तुम्ही... " मी एकदम अवघडलो.

"काय काका, काय ठरवायचं? " नंदुभाऊंनी मुद्द्याला हात घातला.

"आपण काय बोलणार? पसंती त्याला द्यायची आहे, शेवटी संसार त्याला करायचा आहे. " बाबानी जबाबदारी माझ्यावर ढकलली.

"हो, नंतर त्यानी म्हणू नये की आम्ही बायको गळ्यात बांधली" आईनेही चेंडु माझ्या कोर्टात ढकलला.

"काय विजू, तुझं काय म्हणणं आहे? " वहिनींनी सरळच विचारले.

जसं श्रुतीला माझ्याबद्दल ऐकून ऐकून प्रेम वाटायला लागलं होतं तसच मलाही तिच्याबद्दल 'काहीतरी' वाटू लागलं होतं हे खरं. उगाच का मी रात्री जागून विचार करत होतो ?

आता मला चांगली नोकरीही होती. लग्नाचा विचारही होता, फक्त प्रश्न होता ते माझ्या आईच माझ्या बायकोशी पटेल की नाही. पण आता तोही प्रश्न मिटला होता.

"मला श्रुती पसंत आहे" मी म्हणालो, तशी श्रुती लाजली आणि सगळ्यांना हायसं वाटलं. जोगळेकरांनी डोळे पुसले. तितक्यात मैथिली घरात घुसली.

"श्रुतीताई, श्रुतीताई, माझ्याशी खेळ ना ग "

नंदुभाऊंनी तिला प्रेमाने जवळ घेत म्हटलं, "अबे आता ती श्रुतीताई नाही राहिली काही, ती आता तुझी काकू होणार आहे"

"मग काकू झाल्यावर तु माझ्याशी खेळनार नाही का ? "

तिच्या या निरागस प्रश्नावर सगळेच हसू लागले.

प्रेमात पड्लेल्यांची सदा उडवणा-या पियुषची पण दांडी उडाली


प्रेम नावाची गोष्ट कधी पियुष च्या जिवनात येइन असे कोणालाच सांगुनही खरे वाटले नसते. कारणच तसे होते, कॉलेज चा सर्वात डांबरट म्हणुन ओळखल्या जाणा-या, आपल्याच मस्तीत राहणा-या, दारुचे बंपर चे बंपर हे हे म्हणता-म्हणता रिते करण्यारा,टीचर लोकांची मजा घेणा-या, अभ्यास न करताही पहिल्या दहात राहणारा आणी प्रेमात पड्लेल्यांची सदा उडवणा-या पियुष उर्फ़ "पिया" ची पण दांडी उडेन असा कोणी स्वप्नातही विचार केला नसेन.

_______________________________________________________________________________

पियुष आणी मी सर्वप्रथम हॉस्टेल मधे भेटलो. एकच ब्रान्च असल्याने सोबत येणे जाणे व एकच रुम असल्याने तसेच स्वभाव जुळत असल्याने आम्ही लवकरच चांगले मित्र झालो. आत्ता पर्यंत वडिलांची सेनेतली बदलीची नोकरी व थोड्या वेगळ्या स्वभावामुळे पियुष चे असे मित्रं खुप काही नव्हतेच, त्यामुळे कॉलेज मधे पण तो खुप मित्रं बनवायच्या भानगडीत नाहिचं पडला. त्यात त्याच्या (अप) किर्तिमुळे मुलीदेखिल त्याच्या पासुन दुर पाहायला राह्यच्या. त्यामुळे प्रेम हे कधी पियुष च्या नजरेत नव्हतेच, पण मुलखाचा डॅम्बिसपणा आणि लफ़ंटरपणा हे त्याचे गुण त्याला कधी ती कमतरता जाणवुचं नाही द्यायचे.
______________________________________________________________________________

"अबे भडव्या उठ, संध्याकाळचे ६ वाजत आहेत. कमनिय बांध्यांच्या ललनांची स्तुती करायला जायचं नाही का.?", आपली पेटंट शीवी देत, माझ्या पार्श्व-भागात एक सणाणती लाथ देत पियुष ओरडला.

"काय आहे बे, झोपु दे नं, आज देसायाने चार वाजेपर्य़ंत पकवलां.", मी पांघरुण ओढत म्हणालो.

"देसायाची आय...., तु उठतोस की आता बादली ओतु.?"

हा धोक्याचा इशारा होता. पियुष जे म्हणायचा ते खरा करायचा. याचा अनुभव एकदा माझ्या डोक्यावरचे
कुरतडलेले केस, दरवाज्याची तुट्लेली कडी, फोडलेलं कपाट या गोष्टींमुळे मला होता.

एकदम उठुन बसत मी विचारलं, "कुठे जायचं बे..?"

"तिथेचं, जिथे रोज जातो..", पिया डोळे मिचकावत म्हणाला.
_______________________________________________________________________________

मोनु ची टपरी म्हणजे आमचा रोज संध्याकाळचा अड्डा आणी पिया साठी माल (म्हणजे मुली हो) टापण्याची जागा. सिगारॆट पित आणी पाजत पियुष माझ्या सोबत बसायचां आणी येणा-या जाणा-या मुलिं बाबत अत्यंत कल्पक भाषेत वर्णन करायचा. जसे की, "ती बघ, ती आज बॉयफ़्रेंडसोबत भांडुन आली आहे.. " किंवा, "ती बघ, ती नक्की सिगरेट पिणारी आहे.".

मात्र आज पियुष खास मुड मधे दिसत होता. नेहमिच्या मोठ्या गोल्ड ऎवजी जेव्हा साहेबांनी आज मॉन्ड घेण्याचे ठरवले, तेव्हाच माझ्या लक्षात आले.
“ए हिरोइण..!”, पियुष ने रस्त्याने जाणा-या ३ मुलींपैकी एकिकडे पाहुन ओरडला.
पियुष चे नेहमिचे उद्योग जाणुन असणारे हसले, काहिंनी दुर्लक्ष केलं.
मुली नेहमी प्रमाणे मान खाली टाकुन निघुन जाणार असे समजुन मी एक कश मारणार तेवढ्यात,

“ एक्सक्युस मी, तुमच्या पैकी कोणी आत्ता मला हीरोइण म्हणुन आवाज दिला..?”, असा मधुर पण माझी पुर्णपणे टरकावुन लावणारा मुलीचा आवाज आला.
तिचं मुलगी वळुन आता आमच्या समोर आली होती आणी रागाने पाहत होती.

“मी होतो तो, तु छान दिसणारी वाटली म्हणुन हीरोइन म्हणलं. जर तुला चांगल नसेल वाटलं तर तु छान दिसणारी नाही असं समजु?”, इति पियुष.

“पोलिस स्टेशन इथुन खुप दुर नाही आहे मिस्टर मजनु..”

“सॉरी प्लिज, मी माफी मागतो. तुम्ही जा.”, माझी पोलिसांच्या नावाने फाटुन हातात आलेली पण पियुष महाशय अगदी बिनधास्त.

“ ऍकच्युली, मला तो विचार मनात आलाचं नाही, माझ्या मनात तुला कॉफी साठी कुठे ऑफ़र करायची याचा विचार सुरु आहे.”

“आपली लायकी आहे का पाजायची कॉफ़ी.?”

“सायली चल इथुन”, आता मात्र त्या मुलिच्या मैत्रिणी तिला थांबवायचा असफल प्रयत्न करत होत्या.

माझे अर्थातच थांबले होते व त्या जागी मोठा आ वासला होता. कारणच तसे होते, मी आत्तापर्यंत पियुष सोबत इतक्या निडर पणे बोलणारी मुलगी पाहिलिचं नव्हती.

“कॉफी तर मी तुझ्या सोबत तुझ्या फ़्रेंडस ला पण अफॉर्ड करु शकतो, प्रश्न हा आहे की तु येशिल की नाही.”

“चला मुलिंनो, हे महाशय आपल्याला कॉफी ऑफर करत आहेत.”

मी चमकुन मान वर केली..
पियुष पण थोडा चमकलेला दिसला पण लगेच सावरुन घेत मला म्हणाला, “तु पण चल बे, इथे एकटा बसुन काय करशिल.?”,

_________________________________________________________________________________
दुस-या दिवशी, “अबे हरामखोरा, हे पहा तिचा मेसेज आलायं, भेटायचं म्हणते, साल्या तुझा काळा टी-शर्ट दे नं.” पियुष राव ओरडत रुम मधे घुसले.

“कोणाचा रे बाबा..?”

“तिच रे, सायली.., कालची.. काय मुलगी आहे यार. बिलकुल बिन्धास्त.. आपण तर पुरे फ़्लॅट... सांग ना यार काय म्हणु तिला ते..?”, पियुष अगदी आतुरतेनी बोलत होता.

“चला आणखीन एक (की दोन) विकेट पडली...”, मी मनातल्या मनात हासत म्हणालो आणी टी-शर्ट घेण्यासाठी कपाटाकडे वळलो.

माझ्या पहिल्या प्रेमाची शेवटची गोष्ट!!!



आज मला तुझा फक्त थोडा वेळ हवाय, माझ हृदय मोकळ करण्यासाठी...
आज आयुष्यात पहिल्यांदाच कुणाशी तरी अगदी खर बोलतोय, समोरची व्यक्ती नक्की कोण आहे याची खात्री नसतानाही आज एकदाच मन मोकळ कराव वाटलं.....
माझ नाव समीर , आणि माझी गोष्ट सुरु झाली चार वर्षांपूर्वी....अगदी अनपेक्षितपने, १२ विला होतो मी, अगदी हुशार आणि मनमिळावू....नुकतीच कुठेतरी माझ्या आयुष्याला सुरुवात झाली होती...कित्येक स्वप्न होती माझी....सगळ काही व्यवस्थित सुरु होतं.....दररोज बसने जायचो कॉलेजला....सराव परीक्षा सुरु होती ...लवकर बस मिळावी म्हणून अस्वस्थ झालो होतो , इतक्यात बस आली, घरी जायची फार घाई झाली होती, डोक्यात physics , chemistry आणि mathematics ने उच्छाद मांडला होतां...गाडी प्रत्येक ठिकाणी थांबत निघाली आणि मी स्वतःला त्या गाडीत बसल्याबद्दल अक्षरशः शिव्याच घालू लागलो, आणि अचानक गाडी थांबली...बाहेर बघितलं तर कुठलही गाव नव्हत म्हणून जरा रागातच बाहेर बघितलं...........!!! पण बाहेर जे बघितलं ते आयुष्यात कधीही विसरण्याजोग नव्हत....एक अतिशय निरागस, सुंदर परी त्या बस मधनं खाली उतरली....तिच्या बोलक्या डोळ्यात एक वेगळीच जादू होती...माझ्या आयुष्यात मी इतका सुंदर आणि निरागस चेहरा कधीच बघितला नव्हता...आणि अचानक तिची आणि माझी नजर-नजर झाली!!! हृदयाची चाक जोरजोराने फिरू लागली...ती धड-धड त्या वेळी अगदीच जीवघेणी वाटली....बस सुरु झाली आणि ती आकृती माझ्यापासून दूर जाऊ लागली....नकळतच डोळ्यात अश्रू जमा झाले...हे काय आहे आणि का होतंय हे कळण्याइतक डोक कदाचित मोठ झाल नसाव मात्र प्रेम करण्याइतक माझ हृदय मात्र मोठ झाल होत.....आयुष्यात प्रथमच प्रेमाची जाणीव झाली....
दुसऱ्या दिवशी मुद्दामच थोडा उशीर केला आणि त्याच गाडीत बसलो....नजरा तिलाच शोधात होत्या मात्र ती गर्दीत कुठेतरी अदृश्य झाली होती......आणि अचानक गाडी पुन्हा त्याच ठिकाणी थांबली जिथे कालच मी तिला पहिल्यांदा बघितलं होत.....आणि पुन्हा तेच सर्व घडल, जे काळ घडल होतं....तिच्या डोळ्यात मी माझ सर्वस्व हरवून बसलो होतो....
पण हे कळायला वेळही लागला नाही कि आपण आयुष्याच्या अगदीच चुकीच्या वळणावर प्रेमात पडलोय.... १२ वी ची परीक्षा अगदी तोंडावर आलेली असताना आपण प्रेमात पडलोय....तेव्हा ठरवलं कि नाही...उद्यापासन तिला बघायचं नाही....सगळ काही विसरायचं...पण ते शक्य नाही होवू शकलं.....दोनच दिवसात डोक्याने हृदयासमोर शरणागती पत्करली......रात्री दोनला उठून रोडवर येवून बसलो.......मी काय करतोय याची पुसटशी कल्पनाही मला नव्हती......माझा कधीही देव नावाच्या गोष्टीवर विश्वास नव्हता...पण त्या दिवशी अचानक मी देवाशीच बोलायला लागलो, अगदी माझ्याही नकळत....!!! तो देवही कदाचित आश्चर्यचकित झाला असावा!!!! त्यानंतर तो ही मला साथ देवू लागला....५.३० ला सुटणार मझा कॉलेज ४.३० लाच सुटू लागल.....माझी सुटलेली बस मला अचानक रस्त्यात भेटू लागली...आणि त्या परीचा चेहरा माझ्या हृदयावर कोरला गेला......
बघता-बघता १२ वी ची परीक्षा आली, माझे वडील एक नामवंत वकील, त्यांचं स्वप्न होतं की मी अस काही कराव की जगाने फक्त बघत रहाव.....त्यांचं स्वप्नं पूर्ण करण्यासाठीच मी आयुष्यभर धडपड करत आलो....पण आता त्यांचं स्वप्नं पूर्ण करण्यासाठी मला तिथून फार दूर निघून जाव लागणार होतं.....माझ्या परीपासुनही दूर....पण हे मी कधीच मान्य करू शकत नव्हतो......तिच्यापासून दूर जाण्याचा विचारही मला घाबरवून सोडायचा.....आणि मग मी तो निर्णय घेतला ज्याने कदाचित माझ्या आयुष्याला वेगळीच कलाटणी दिली!!!
मी १२ वी च्या परीक्षेला गेलोच नाही....घरी हे समजल्यावर काय होईल याची भीती मला कधीही नव्हती....पण त्या वेळी मी सगळ काही खर-खर आपल्या वडिलांना सांगून टाकल.....माहित नाही का? पण कदाचित मन मोकळ कराव वाटल.....आणि त्या दिवशी माझ्या वडिलांचा एक वेगळाच चेहरा बघितला....मला रागवण्याच्या ऐवजी मला अगदी जवळ घेवून ते म्हणाले, " तू वाघाचा मुलगा आहेस, असे निर्णय घ्यायला वाघाचच काळीज लागत....ज्याच मन खर असत ते पोरंच फक्त आपल्या बापाला असं काही सांगू शकत, आणि माझ स्वप्नं पूर्ण करण्यासाठीतर तुझ्याकडे संपूर्ण आयुष्य आहे!!!
.
.
त्यानंतर घरात कधीही हा विषय निघाला नाही.....मी वाट बघत होतो तिच्या सुट्ट्या संपण्याची.....दीड महिन्यांच्या मोठ्या सुट्ट्या होत्या त्या....एक-एक दिवस शंभर वर्षांसारखा वाटत होतां...रोज तिची आठवण यायची, रोज डोळे भरून यायचे...स्वतःला समजावत, कसेबसे मी दिवस काढत होतो....आणि एक दिवस आला जेव्हा ती पुन्हा माझ्या समोर उभी होती, तिला बघताच असं वाटलं की जाव आणि तिला सगळ काही खर-खर सांगाव.....पण हिम्मत नाही झाली!!!
.
.
पण एक दिवस उजाडला ज्या दिवशी मी ठरवलं की आज काहीही झाल तरीही तिला सांगायचच.....
पहिल्यांदाच तिच्याशी बोलायचं होतं, तिच्या नकाराची प्रचंड भीती वाटत होती तरीही हिम्मत केली....आणि ते ही बसमध्येच....!!!!
.
.
संध्याकाळी घरी आल्यानंतर डोक सुन्न झालेलं होतं....मी काय करतोय मलाच माहिती नव्ह्तं...तिच्याशी बोलतानी किती नर्वस झालो होतो मी, मूर्खासारख तिचं नाव विचारलं मी तिला....मला तीच नाव माहिती होत........असणारच......जे नाव माझ्यासाठी सर्वस्व झाल होत, ते नाव विचारलं मी तिला....मी खरच वेडा होतो, कदाचित आजही असेल....
.
.
त्या नंतर तिच्याशी बोलण्याच्या कित्येक संधी मिळाल्या, पण मला कधीही नीट बोलता आल नाही...ती समोर येताच तोंड आणि डोक आपल काम बंद करून तिच्या डोळ्यांवरच आपल लक्ष केंद्रित करायचे!!!
.
.
दिवस जात होते, माझ मन दररोज तुटत होतं, पण तरीही फक्त माझ्या प्रेमावर असलेल्या विश्वासामुळे मी दररोज तिच्याकडे किंचित आशेने बघायचो...
.
.तिच्यासाठी बस मध्ये दररोज जागा पकडायचो, पण ती कधीही माझ्याशेजारी बसली नाही......पण एक दिवस अचानकच आणि अगदी अनपेक्षितपणे ती आली आणि अक्षरशः माझ्या शेजारी बसली....हृदय बंद पडल....हातपाय हलेनासे झाले....काही बोलाव असं वाटलं तर ओठ शिवले गेले!!!! काही नाही बोलू शकलो.....आयुष्यात पूर्वी असं कधीही झाल नव्हत......पण एका परिशी बोलण्याची हिम्मत माणसात इतक्या सहज-सहजी येत नाही....
.
.
दुसरा दिवस, ८/८/२००८, कदाचित माझ्या आयुष्यातला सर्वात चानला दिवस....ती पुन्हा माझ्या जवळच बसली....आणि मी पुन्हा गप्प!!! उतरताने माझ्या नजरेशी बोलणारे तिचे डोळे मला खूप काही सांगून गेले....ती खाली गेली...आणि तिने मला पहिल्यांदाच बाय-बाय केला!!! माझा माझ्या डोळ्यांवर विशास नव्ह्ता, अगदी सगळा जग जिंकल्यासारखा वाटत होतं....पण अचानक मनात विचार आला......हा शेवटचा बाय-बाय तर नव्हता ना???? का कुणास ठावूक...देवाने मला पुढे होणाऱ्या गोष्टींची हलकीशी जन करून दिली!!! आणि जाळी तसंच...३०/०८/२००८ माझ्या आयुष्यातला सर्वात वाईट दिवस......मी माझ्या प्रेमाला गमावून बसलो......काही कळण्याच्या आताच माझी सगळी स्वप्नं बेचिराख झाली.... हृदय नावाच्या गोष्टीचे अनंत तुकडे झाले, डोळे कायमचेच सुकून गेले!!!! माझ जिच्यावर जीवापाड प्रेम होत त्या परीच मात्र तिच्या आयुष्यावर अजिबात प्रेम नव्हतं.....
ती मला कायमच सोडून गेली......
.
.
एकेकाळी माझी मदत करणारा देवही कदाचित आता माझा राहिला नव्हता....आता नाही होत कसलाही योगायोग.....त्या बस मध्ये बसूनही नाही येत माझी परी माझ्या डोळ्यांसमोर...पण आजही नजरा फक्त आणि फक्त तिलाच शोधत असतात!!!
(काल्पनिक)

वात्रट मुलाची कथा...


एक तरूण आणि एक तरूणी.

दोघंही एकाच कॉलेजची.तो फायनल इयर ला तर ती दुसऱ्या वर्षाला. तो साधारण परिस्थिती मधला, बॅंक लोन वर शिकणारा, दिसायला पण ठीक ठाक- म्हणजे सलमान सारखी बॉडी नाही, किंवा शाहरुख सारखा प्रेझेन्स नाही, तरी पण सगळ्या गृप मधे सगळ्यांच्याच जवळचा जीवभावाचा सखा .

इतकं जरी असलं, तरीही ’ती’ म्हणजे एका चांगल्या कंपनीत उच्च पदावर काम करणाऱ्या एका अधिकाऱ्याची मुलगी, पैसा वगैरे खूप नाही, पण अगदी कमी पण नाही.जे मागितलं ते बाबा आणून देतात, पैशाची कमतरता म्हणजे काय ते माहिती नाही त्याच्या पासून फटकूनच वागते.

त्याची आणि तिची नेहेमीच एकमेकांची टांग खेचणं सुरु असतं. त्याला ती आवडते, तिला पण तो (बहुतेक) आवडतो, पण ती मात्र ही गोष्ट मान्य करत नाही कधीच.कदाचित त्याची लेडी किलर म्हणून प्रसिद्धी असेल की ती नेहेमी दूर रहायचा प्रयत्न करते त्याच्या पासून.ट्रेकिंग गृप मधे बरेचदा बरोबर ट्रेक केलेला. तेंव्हा तिच्या लक्षात आलं की तो तिच्यावर फिदा आहे, पण तिने मात्र त्याला स्वतःच्या मनात काय आहे याचा ताकास तूर लागु दिलेला नाही.

दोघेही नेहेमीच एकत्र भेटत असतात, कोणी समोर नसलं ,की त्या दोघांची नोंक झोंक सुरु असते. .दोघांनाही माहिती आहे का- हो कदाचित असावं, की दे लव्ह इच अदर .. बट डोन्ट वॉंट टू ऍग्री.

प्रसंग -१

ती एकटीच बसलेली आहे कॅफेटेरियात, मित्र मैत्रिणींची वाट पहात. ऑफ पिरियड मधे आज इतर मुलं सुटलेले प्रॅक्टीकल करायला गेले होते, पण तिला काहीच काम नव्हतं. तो समोरून येतो. समोरासमोर आल्यावर एकमेकांना विश करणे आलेच. ती च्या चेहेऱ्यावर हसू आलं- पण क्षणभरच!! त्याने एकदम काळजीयुक्त चेहेरा केला होता आणि एकदम आश्चर्याने तिच्या कडे पाहिले.

आता मात्र ती थोडी गोंधळली. काय झालं असेल? का म्हणून असा पहातोय विचित्र नजरेने? ती स्वतः बद्दल उगाच कॉन्शस झाली. नजरेनेच विचारले?

तो म्हणाला, तुझ्या केसात काही तरी अडकलय.. थांब जरा… आणि त्याने हाताने तिच्या केसावरून हात फिरवला- तिच्या लक्षात आला त्याचा वात्रटपणा. तिला हसू आलं आणि त्याचा कावा लक्षात आला, पण तेवढ्यात त्याने आपला ’कार्यभाग ’ साधला होता.

त्याने पटकन हात समोर केला, आणि म्हणाला, दे शंभर रुपये?

कसले?

तुझे केस स्वच्छ करण्याचे. तुला काय वाटले ही अशी लोकांना स्वच्छ करण्याची सगळी घाणेरडी कामं मी काय फुकट करतो की काय? चांगला इंजिनिअर आहे, सगळ्यांकडून तर पाचशे रुपये घेतो स्वच्छ करण्याचे, तू मैत्रीण म्हणून शंभरच मागितले..

तिचा चेहेरा रागाने लालबुंद झाला,

ती आता रिऍक्ट करणार तेवढ्यातच त्याने तिला म्हंटले, बरं ते जाऊ दे, तु इतकी सुंदर आहेस म्हणुन , आणि एक स्टूडंट आहेस म्हणून, चल तुला सूट देतो, फक्त एक वडा पाव -पेप्सी मागव.. सोडले शंभर रुपये तुझे . इतका इंजिनिअर झाडूवाला मिळतो का इतक्या कमी किमतीत?

ती लाजली, आणि त्याला मारायला धावली, समोरच्या टेबलवरचा ग्लास पडला पाणी सांडलं पण तिकडे लक्ष नव्हतं दोघांचंही. पुस्तकं भिजताहेत. नशीब, तेवढ्यात इतर मित्र मंडळी पण आली, आणि दोघेही हसत सुटले.

प्रसंग २:-
तो बसलाय मित्रांसोबत गप्पा मारत. ती अजून आलेली नाही. विषय आहे, की मुली लॉजिकली विचार करतात की इमोशनली. त्याचं म्हणणं होतं की त्या लॉजिकली विचार करुच शकत नाहीत. त्यांच्या मेंदूमधला इमोशनल कोष कोणी हळूवार पणे स्पर्श केला तर त्यांचं लॉजिक पुर्ण पणे वाहून जातं . अगदी साधारण दिसणाऱ्या मुलाच्या प्रेमात एखादी सुंदर मुलगी पडलेली पाहिली की हा प्रश्न नेहेमीच पडतो – की तिने काय पाहिलं असेल ह्या माणसात? ही कॉमेंट तर बरेचदा ऐकू येते अशा परिस्थितीत-” बंदर के हाथ मे अद्रक”!! :)

त्याचं हे नक्की प्रिन्सिपल होतं की मुली प्रेमात पडतात ते आपोआप, त्यांच्या इच्छे विरुद्ध! सगळं काही आपोआप होत असतं . ठरवून काही प्रेम होत नसतं हे मात्र नक्की. एखाद्या मुलीने लॉजिकली विचार करुन कितीही टाळलं तरीही इमोशनल माईंड चा कॉर्ड जर स्पर्शला गेला असेल तर … नो वन कॅन स्टॉप इट!!

गृप मधल्या मुलींचं म्हणणं होतं की आजकाल सगळ्या सुशिक्षित आहेत, म्हणून अर्थातच लॉजिकली विचार करतात. बराच वेळ अशीच चर्चा सुरु होती आणि लवकरच सगळे निघून गेले पिरियडला.

प्रसंग -३

पुन्हा कॅंटीन. ती एकटीच बसलेली आहे. तो समोरून येतो. परवाची त्याच्यामुळे झालेली एम्ब्रॅसमेंट ती विसरलेली नव्हती. तिने त्याच्याकडे अगदी अनोळखी नजरेने पाहिले.

हाय! कसली क्युट दिसते आहेस गं तू? पण जाम भिती वाटते बरं का मला अशा सुंदर मुलींची.

तिला खूप बरं वाटलं, कोणी सौंदर्याची तारीफ केली की बरं वाटतंच ना.तिच्या चेहेऱ्यावर पुन्हा एक मोठं प्रश्न चिन्ह!! हातातल्या सेल फोनशी चाळा करत बसली होती ती.

बोलायचं नाही हे ठरवलं होतं, पण रहावलं नाही.. शेवटी ती म्हणालीच- कां बर? कसली भिती वाटते?

त्याचं उत्तर अनपेक्षित होतं, सगळ्या सुंदर मुली बिनडॊक असतात, आणि ते त्यांना पक्कं माहिती असतं, म्हणून तो ’मेंदूचा रिकामापणा’ त्या आपल्या सौंदर्याने झा्कून टाकण्याचा प्रयत्न करतात.

आता मात्र ती खूप चिडली होती. स्वतःला समजतो तरी काय हा? इतकी स्वतःबद्दलची घमेंड आहे तर कशाला येतो नेहेमी बोलायला, म्हणे सुंदर मुली बिनडोक असतात. मूर्ख कुठला. याला काही समजतं का? नेहेमी निळ्या जिन्सवर हिरवा शर्ट घालणारा बावळट माणूस !! बस्स इतक्याच शिव्या येत असतात तिला.. स्वतःचाच संताप येतो. धड शिव्या पण देता येत नाहीत आपल्याला ?? काय आयुष्य आहे आपलं?

’ती म्हणाली गेट लॉस्ट .. मला अजिबात बोलायचे नाही तुझ्याशी’.

’तू नेहेमीच अशी रुड बोलत असते का लोकांशी? लहानपणापासून तुला कोणी शिकवलेलं नाही वाटतं की लोकांशी कसं बोलावं ते”

’एक्सक्युज मी… काय म्हणालास??’

’सॉरी ..तू यु आर नॉट ऑफ माय टाइप’.

’गेट लॉस्ट.. आय डॊन्ट लाइक यु, ओव्हरस्मार्ट रॅट.’.

’मला माहिती आहे मुली नेहेमीच जर त्यांच्या मनात नाही असेल तर हो आणि हो असेल तर नाही म्हणतात.’ हे असं नेहेमीच होतं मला माहिती आहे,तुला माझ्यामधे इंट्रेस्ट आहे म्हणून.

तिचा संताप शिगेला पोहोचला होता. काय करावे सुचत नव्हते. रागाने लाल झाली होती ती. स्वतःचेच केस उपटून घ्यायचे बाकी ठेवले होते.

तू माझ्या मागे का लागला आहेस. मला माहीत आहे की तू काय ट्राय करतो आहेस ते- माझ्यावर चालणार नाही.

ओह..खरंच?? इज दॅट सो?? यु आर सो अट्रॅक्टेड टुवर्ड्स मी, दॅट यु आर ट्राइंग टु फिगर आउट माय माइंड.. ग्रेट!!

मला माहिती आहे, तुला मी आवडते, म्हणुन तू असे नेहेमीच मला छळत असतोस.

“कसला गोड गैरसमज आहे तुझा!”

तिच्या मनात त्याच्या बद्दल इतका राग आला होता पण काहीच करता येत नव्हतं. कसा आहे हा ? इतका आढ्यताखोर माणुस पाहिला नाही कधी., इतके मित्र आहेत, पण असं बोलणारा एकही नाही. सगळे कसे गोंडा घोळत असतात समोर समोर. हाच एक वेगळा आहे जरा. लॉजिकली आवडायला नको हा आपल्याला, पण इतकी भांडणं, हॉट डिस्कशन्स होऊन पण याच्यासोबत का बरं वाटत असेल आपल्याला? ती विचार करत बसली.

तिच्या चेहेऱ्यावरचे रागीट भाव अचानक स्मित हास्यात बदलले, तो म्हणाला , तुझ्या बद्दल मला एक मस्त गोष्ट समजली आहे.
तिने ठरवले असते की ह्याच्या ट्रॅप मधे अडकायचे नाही. तरी पण तिला विचारल्या शिवाय रहावत नाही.. ती म्हणाली काय?
तो म्हणाला- ही योग्य वेळ नाही, नंतर सांगीन कधीतरी ..

तेवढ्यात समोरून दोन मित्र येऊन टेबलवर जॉइन झाले, आणि अर्थातच ह्यांच्या गप्पा बंद पडल्या.

प्रसंग ४

ती तिच्या मैत्रिणी बरोबर बसलेली आहे. कॅन्टीन मधे समोर कोल्डड्रिंक ची बाटली आहे. दोघी अगदी जिवश्च कंठश्च मैत्रिणी. मैत्रिणीला त्याच्या बद्दल सांगते ती. कसा सारखा त्रास देत असतो ते.

मग त्याच्याशी बोलणं का बंद करत नाहीस. अव्हॉइड कर ना त्याला.

अगं पण त्याची कंपनी बरी वाटते ग.. नाही कसं म्हणू त्याला?

ओह.. म्हणजे तू प्रेमात पडली आहेस तर..

मी?? छेः, अशक्य!! प्रेमात पडणं तर अशक्यच! अगदी जगातला शेवटला पुरुष जरी असला, तरी पण ह्याच्याशी लग्न? इम्पॉसिबल!!

मैत्रीण म्हणाली, अगं बहुतेक असंच असावं. विचार कर. पण मी त्याला कसं विचारू? प्रत्येकच गोष्ट अगदी कॅज्युअली घेतो तो.

साधी गोष्ट – जस्ट क्रिएट जेलसी.. ऍंड ही विल कम आउट ऑफ द क्लोझेट

***
प्रसंग – ५
कॅंटीन , सगळे मित्र मैत्रिणी बसलेले आहेत. समोर एक पेढ्यांचा डबा उघडा ठेवलाय. तेवढ्यात तो येतो, आणि समोर पेढे बघून एक पेढा उचलतो. कोणाचे पेढे रे?
लग्न ठरलंय.. एक मित्र म्हणाला.

कोणाचं?

’ति’चं..

काय?? कोण आहे तो तिच्याशी लग्न करतोय? पण चेहेरा पडला होता खर्रकन.

तिच्याकडे पाहिले. चेहेऱ्यावरचा खट्याळपणा लक्षात आला. त्याला काहीच कळले नाही. हातातला पेढा हाताच राहिला.

तेवढ्यात तिची मैत्रीण उठली, आणि म्हणाली, अरे ’ती’चे नाही, माझ्या ताईचे ठरले आहे लग्नं, खा पेढा.. आणि त्याचा जीव भांड्यात पडला एकदम.

त्याला आता मात्र रहावलं नाही. लक्षात आलं की आता वेळ केला तर वेळ निघून जाईल. सगळ्यांसमोर तिला विचारले, बघ, माझं पीजी पुर्ण झालंय. कॅंपस मधे सिलेक्शन पण झालंय एका कंपनीत. पॅकेज पण बरं आहे. तू माझ्याशी लग्न करशिल??

ती काहीच बोलली नाही, फक्त हसली, विथ द अशुरन्स टु सपोर्ट हिम लाइफलॉंग.लग्नानंतर त्याने पुर्वी दिलेल्या त्रासाचा बदला तिने घेतला की —- हे त्या दोघांनाच माहिती!